नागपुरातील  लोक न्यायालयाच्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:41 AM2018-02-10T00:41:38+5:302018-02-10T00:44:54+5:30

लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे.

In the lok adalat of Nagpur, the third gender Vidya kamble is included in panel | नागपुरातील  लोक न्यायालयाच्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्याचा समावेश

नागपुरातील  लोक न्यायालयाच्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्याचा समावेश

Next
ठळक मुद्देआत्मसन्मान : समाजात सकारात्मक संदेश







नागपूर : लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे.
शनिवारी नागपूर जिल्हा न्यायालयात लोक न्यायालय आयोजित करण्यात आले आहे. त्यातील प्रकरणांवर निर्णय देण्यासाठी पॅनल स्थापन करण्यात आले आहेत. एका पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक अन्य सदस्याचा समावेश असतो. विद्या कांबळे यांना सदस्य होण्याचा मान मिळाला आहे. कांबळे गेल्या १० वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढत आहेत. पॅनलमध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी न्यायाधीश व वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खटल्यांचा अभ्यास केला आहे, अशी माहिती मिळाली.

Web Title: In the lok adalat of Nagpur, the third gender Vidya kamble is included in panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.