महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:39 PM2018-08-30T22:39:07+5:302018-08-30T22:41:14+5:30

जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार,असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.

Let's fight for Mahabodhi Vihar till the last moment | महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार 

महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार 

Next
ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा निर्धार

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार,असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.
इंदोरा बुद्ध विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने गुरुवारी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८४ वा वाढदिवस व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री नितीन राऊत, मनपा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, अ‍ॅड. भास्कर धमगाये, अमित गडपायले, अशोक कोल्हटकर, अ‍ॅड. अजय निकोसे उपस्थित होते.
भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना शाल, स्मृतिचिन्ह, चिवरदान, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुधीर फुलझेले, विलास गजघाटे व प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांनीही भदंत ससाई यांचा सत्कार केला. यावेळी इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांचा भदंत ससाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भंते नागघोष यांनी बुद्धवंदना घेतली. प्रास्ताविक अरुण नागदिवे यांनी केले. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. स्वागत संस्थेचे सचिव अमित गडपायले व उपाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर धमगाये यांनी केले.
इंदोरा बुद्ध विहार येथे भदंत ससाई यांना मान्यवर व नागरिकंकडून शुभेच्छा देण्याचे सत्र दिवसभर सुरू होते.
कुणाचाही द्वेष करू नका
तत्पूर्वी ‘आज जगाला शांतता, प्रेम, करुणा आणि मैत्रीची खऱ्या अर्थाने गरज आहे, तेव्हा कुणाचाही द्वेष करू नका’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे. आपले जीवन सुकर घडवायचे असेल तर त्यांचे विचार आत्मसात करा, असा धम्मसंदेश भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिला.

Web Title: Let's fight for Mahabodhi Vihar till the last moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर