नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 10:57 AM2018-02-06T10:57:32+5:302018-02-06T11:01:46+5:30

गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खापा क्षेत्रात सोमवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Leopard found dead in the forest area of ​​Saoner near Nagpur | नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

नागपूरनजिक सावनेरच्या वनक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

Next
ठळक मुद्देटेकाडीजवळील घटना मृत्यूचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खापा क्षेत्रात सोमवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. विद्युत प्रवाहाने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वन विभागाचे कर्मचारी सोमवारी गस्तीवर होते. दरम्यान, मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या टेकाडी गावाजवळ त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळला. सदर बिबट्या आठ वर्षांचा असून त्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता आहे.
घटनास्थळाचा पंचनामा, उत्तरीय तपासणी केल्यानंतर बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी वन कर्मचारी नीलेश गावंडे, मानद वन्यजीव कुंदन हाते, पशुवैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी विद्युत प्रवाहित कुंपण तारांना त्याचा स्पर्श झाला असावा, अशी शक्यता आहे.

Web Title: Leopard found dead in the forest area of ​​Saoner near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.