निर्बंधामध्ये शिथिलता; पण नियम पाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 09:07 PM2021-06-01T21:07:40+5:302021-06-01T21:11:49+5:30

Radhakrushn B राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे नागपूर शहरात लागू असलेल्या निर्बंधामध्ये १ जूनपासून १५ जूनपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Laxity in restraint; But follow the rules! | निर्बंधामध्ये शिथिलता; पण नियम पाळा!

निर्बंधामध्ये शिथिलता; पण नियम पाळा!

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन : जबाबदारी ओळखून वागा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे नागपूर शहरात लागू असलेल्या निर्बंधामध्ये १ जूनपासून १५ जूनपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने सुरक्षेची काळजी घेत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे.

दुकानातील कर्मचाऱ्यांनी चाचणी करावी

जीवनावश्यक वस्तू व नवीन आदेशात परवानगी देण्यात आलेल्या वस्तूंची दुकाने सुरू करताना दुकानातील सर्व कर्मचारी, कामगार यासह ऑनलाईन अन्न तसेच अन्य साहित्यांचा पुरवठा करणारे डिलिव्हरी बॉय या सर्वांची मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रामध्ये नि:शुल्क आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन राधकृष्ण बी यांनी केले आहे.

नागपुरात १ ते १५ जून २०२१ पर्यंत काय सुरू आणि काय बंद राहील याची माहिती

काय सुरू राहील? (प्रतिष्ठाने व सेवा)                                   

वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील

वृत्तपत्र, मीडियासंदर्भातील सेवा (ओळखपत्राच्या आधारे)                         सुरू राहतील

पेट्रोल पंप, गॅस एजन्सी सुरू राहतील

सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा ऑटोरिक्षा (चालक दोन प्रवासी)

टॅक्सी (चालक ५० टक्के प्रवासी क्षमता)

बस (प्रवासी क्षमतेनुसार) उभे प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही

माल वाहतूक सेवा सुरू राहतील

उद्योग, कारखाने                                     सुरू राहतील

बांधकामे (फक्त साईटवरच लेबर उपलब्ध असल्यास)             सुरू राहतील

बँक व पोस्ट सेवा                                                 सुरू राहतील

कोरोनाविषयक लसीकरण सेवा व चाचणी केंद्रे                        सुरू राहतील

किराणा दुकाने, बेकरी दुकान सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

दूध विक्री, फळे विक्री व पुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

भाजीपाला विक्री व पुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

चिकन, मटन, अंडी व मांस दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

पशुखाद्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

ऑप्टीकल्स दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

खते व बी-बियाणे दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

निवासाकरिता असलेले हॉटेल, लॉजेस (५० टक्के क्षमतेने) फक्त हॉटेलमध्ये निवासी असलेल्या ग्राहकांसाठीच किचन सुरू ठेवता येईल.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ (घरपोच सेवा) सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत

बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत (स्टॅण्ड अलोन) एकल दुकाने (शॉपिंग सेंटर व मॉलमधील दुकाने वगळून) (शनिवार व रविवार बंद) सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत

अ‍ॅडव्होकेट व चार्टर्ड अकाऊंटंट खासगी कार्यालय २५ टक्के किंवा ५ च्या क्षमतेने

शासकीय कार्यालये (कोरोनाविषयक कामे नसलेली) २५ टक्के क्षमतेने

मद्य विक्री फक्त होम डिलिव्हरी

लग्नसमारंभ २५ टक्के लोकांच्या मर्यादेत, समारंभ फक्त दोन तासांकरिता

पूर्णपणे बंद असलेल्या आस्थापना

• सलून

• स्पा

• ब्युटी पार्लर

• जिम्नॅशियम

• शाळा/कॉलेज, कोचिंग क्लासेस

• उद्याने

• स्विमिंग पूल

• सिनेमा हॉल

• नाट्यगृह

Web Title: Laxity in restraint; But follow the rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.