फ्लाय अ‍ॅश क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:51 AM2017-08-17T01:51:23+5:302017-08-17T01:51:47+5:30

फ्लाय अ‍ॅशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व विट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.

Launch of employment generation through fly as cluster | फ्लाय अ‍ॅश क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीला चालना

फ्लाय अ‍ॅश क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीला चालना

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कोराडी व खापरखेडा येथे देशातील पहिल्या फ्लाय अ‍ॅश क्लस्टरचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : फ्लाय अ‍ॅशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व विट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. डिसेंबरअखेर कोराडी व खापरखेडा येथील फ्लास अ‍ॅश क्लस्टरची उभारणी पूर्ण करून या अंतर्गतच्या उद्योगाद्वारे रोजगार निर्मितीस चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
वारेगाव (खापरखेडा) येथील फ्लाय अ‍ॅश इंडस्ट्रीयल क्लस्टर तथा फ्लाय अ‍ॅश इनक्युबेशन, संशोधन व कौशल्य विकास केंद्र (कोराडी) याचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, संतोष आंबेरकर, कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे, कैलास चिरुटकर, अनिल नंदनवार, राजू बुरडे, संचालक सुधीर पालीवाल, अनिल पालमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण माथुरकर, खैरीच्या सरपंच कविता आदमने, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, खापरखेड्याच्या सरपंच अनिता मुरोडिया, पोटा-चनकापूरचे सरपंच ढगे, कोराडीच्या उपसरपंच अर्चना दिवाने, कोराडी महादुला नगर पंचायतच्या अध्यक्ष सीमा जयस्वाल आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, फ्लाय अ‍ॅशच्या वापरासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेले धोरण केंद्र स्तरावरही गौरविले गेले असून हे धोरण देशातही राबविण्यात येणार आहे. फ्लाय अ‍ॅशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व विट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावणे तसेच फ्लाय अ‍ॅश क्लस्टरमधील उद्योंगाद्वारे रोजगार निर्मिती करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. ‘महाजेनको’ने त्यांच्याकडील उपलब्ध जागेचा परिपूर्ण उपयोग करत व्यावसायिक प्रकल्पांना चालना द्यावी. परिसरात वृक्षारोपणांतर्गत पाच लाख झाडे लावावीत. तसेच बांबू उद्यानाची निर्मिती करावी. राखेची उपयोगिता वाढविण्यासाठी सिमेंट कंपन्यांबरोबर करार करावे. या प्रकल्पांतर्गत उद्योगांना स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.
‘महाजेम्स’चे व्यस्थापकीय संचालक श्याम वर्धने म्हणाले, फ्लाय अ‍ॅशवर आधारित उद्योगांसाठी कोराडी व खापरखेडा येथे क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच क्लस्टर ठरणार आहे. फ्लाय अ‍ॅशच्या पूर्ण वापरावर भर देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले असून बांधकामासाठीही फ्लाय अ‍ॅशचा वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. संचालन मिलिंद रहाटगावकर यांनी केले. आभार मुख्य अभियंता अभय हरणे यांनी मानले.

Web Title: Launch of employment generation through fly as cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.