राज्यातील ९२५ गावांमध्ये कापसावर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:01 PM2018-08-02T23:01:02+5:302018-08-02T23:03:33+5:30

राज्यात कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी ‘कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करून त्यांचे दर आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल ९२५ गावांमध्ये कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Larvae infection on cotton in 925 villages in the state | राज्यातील ९२५ गावांमध्ये कापसावर किडीचा प्रादुर्भाव

राज्यातील ९२५ गावांमध्ये कापसावर किडीचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देकॉपसॅपचा अहवाल : शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी ‘कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करून त्यांचे दर आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल ९२५ गावांमध्ये कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात कापूस पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच कपाशीची ३८.७५ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली असून पिके वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषण किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
कॉपसॅपच्या अहवालानुसार राज्यातील ९२५ गावांमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आले. कापूस पिकावर वाढ संजीवके, हार्मोन्स, टॉनिक यासारख्या केवळ कायिक वाढीस मदत करमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषण किडींना पोषक ठरते व रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शेतकऱ्यांना किडीच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढतो.
या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कीड व रोग नियंत्रित करण्यासाठी कृषी सल्ला शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. वाढ संप्रेरक प्रत्यक्ष पीक उत्पादन वाढीबाबत ठोस निष्कर्ष नाहीत अथवा अशा प्रकारच्या शिफारशी अद्यापही कृषी विभागाकडे व संशोधन केंद्रांनी केलेल्या नाही. तसेच या औषधी व रसायनांना केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यामध्ये मान्यता देण्यात आली नाही. केवळ आकर्षक जाहिराती, सुबक पॅकिंग तसेच कोणत्याही अपप्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. तसेच अधिक महितीसाठी जवळच्या कृषी सहायक, कृषी अधिकारी तसेच नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Larvae infection on cotton in 925 villages in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.