प्रत्येक मतदान केंद्र सज्ज ठेवा : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 09:22 PM2019-03-23T21:22:06+5:302019-03-23T21:24:14+5:30

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्र्रावर मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी आवश्यक सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्या, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिल्या.

Keep each polling station ready: Ashwin Mudgal | प्रत्येक मतदान केंद्र सज्ज ठेवा : अश्विन मुदगल

नोडल ऑफीसरकडून निवडमूक कामाचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, राजलक्ष्मी शहा, रवींद्र कुंभारे आदी

Next
ठळक मुद्देनोडल अधिकाऱ्यांकडून घेतला निवडणूक कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्र्रावर मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी आवश्यक सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्या, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिल्या.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात आयोजित केलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले की, दिव्यांग मतदारांना सहज आणि सुलभपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रापर्यंत आणण्याची सुविधा, तसेच मतदारांना मतदान करताना कुठलाही त्रास होणार नाही, यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच मतदान यंत्रे ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील, त्या ठिकाणी विशेष सुरक्षा तैनात करून सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात यावे. निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अधिकाºयांनी दक्ष राहून निवडणुकीचे कार्य करावे, नवीन मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जावर घेतलेल्या निर्णयाची अंतिम माहिती तात्काळ सादर करण्यात यावी, यासह विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी अनिल गडेकर, नोडल अधिकारी (खर्च) मोना ठाकूर, उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त (सायबर सेल) श्वेता खेडकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कार्यातील इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Keep each polling station ready: Ashwin Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.