राष्ट्रपती दौºयाचे ‘आॅप्शन-टू’ जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:35 AM2017-09-22T01:35:28+5:302017-09-22T01:35:44+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नागपूर दौºयासाठी बनविण्यात आलेले रामटेकमधील हेलिपॅड वाहून गेले. परिणामी राष्ट्रपती भवनातून आलेल्या क्लोज प्रोटेक्शन टीम (सीपीटी) ने सुरक्षा यंत्रणेला ‘सुरक्षेचा आॅप्शन -२‘ पर्याय दिला.

Issue-to-issue of President's tour | राष्ट्रपती दौºयाचे ‘आॅप्शन-टू’ जारी

राष्ट्रपती दौºयाचे ‘आॅप्शन-टू’ जारी

Next
ठळक मुद्देरामटेकमधील हेलिपॅड वाहून गेले : सुरक्षा यंत्रणांचा बीपी वाढला; पर्यायी व्यवस्थेत रात्रीचा दिवस

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नागपूर दौºयासाठी बनविण्यात आलेले रामटेकमधील हेलिपॅड वाहून गेले. परिणामी राष्ट्रपती भवनातून आलेल्या क्लोज प्रोटेक्शन टीम (सीपीटी) ने सुरक्षा यंत्रणेला ‘सुरक्षेचा आॅप्शन -२‘ पर्याय दिला. राष्ट्रपतींच्या आगमनाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना सुरक्षेची रामटेकपर्यंत तयारी करावी लागणार असल्याने सुरक्षा अधिकाºयांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. नव्हे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचा रक्तदाब वाढला आहे.
शुक्रवारी, २२ सप्टेंबरला नागपूर-कामठी-रामटेक दौºयादरम्यान राष्ट्रपती हेलिकॉप्टरचा वापर करणार असल्याचे प्रारंभीच्या दौरा पत्रकानुसार ठरले होते. त्यानुसार, सुरक्षा यंत्रणांनी दीक्षाभूमी, शहर पोलीस मुख्यालय, कामठी आणि रामटेकमध्ये हेलिपॅड तयार करवून घेतले होते. हेलिपॅड बनविणे सुरू असतानाच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे हेलिपॅड कच्चे राहण्याचा धोका वाढला होता. तशाही अवस्थेत धोका तपासण्यासाठी राष्टÑपती भवनातून आलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाºयांनी स्थानिक अधिकाºयांना सोबत घेऊन गुरुवारी सायंकाळी नागपुरातील दीक्षाभूमी, शहर पोलीस मुख्यालय, कामठी येथील हेलिपॅडची चाचणी करवून (ट्रायल) घेतली. तिन्ही ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले अन् तेथून ते उडले देखिल. मात्र, हेलिपॅडचे तळ कच्चेच असल्यामुळे सुरक्षा अधिकाºयांची धाकधूक वाढली होती. रामटेकच्या हेलिपॅडची अवस्था त्याहीपेक्षा खराब होती. तेथे वेगवेगळे तीन हेलिपॅड बनवून घेण्यात आले. मात्र, तिन्ही हेलिपॅड पावसाने वाहून गेल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. राष्ट्रपतींच्या आगमनाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना हेलिपॅडने धोक्याचे इशारे दिल्यामुळे पोलीस आयुक्तालयात सायंकाळी ७ पासून वरिष्ठ सुरक्षा अधिकाºयांची बैठक सुरू झाली. त्यात दिल्लीतील सीपीटीचे अधिकारी तसेच महासंचालक (आस्थापना) राजेंद्र सिंह, अतिरिक्त महासंचालक (सीआयडी) संजीवकुमार सिंघल,व्हीआयपी सुरक्षा आयुक्त कृष्णप्रकाश, प्रभारी पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, वाहतूक शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रात्री झाली रिहर्सल, मनुष्यबळही वाढले
या बैठकीत दिल्लीहून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देऊन राष्ट्रपतींचा नागपूर-रामटेक हवाई दौरा रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर नागपूर-रामटेक रस्त्यावर सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्यामुळे, स्थानिक सुरक्षा अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. लगेच व्यवस्था करण्याचे निर्देश मिळाल्याने, शहर आणि ग्रामीण (जिल्हा) पोलीस दलाने रात्री ७ नंतर सुरक्षेची वेगवेगळी रंगीत तालीम (रिहर्सल) घेतली. (यापूर्वी दिवसादेखील ही रिहर्सल घेण्यात आली होती.) एवढेच नव्हे तर सुरक्षा व्यवस्थेतही बदल करण्यात आला. त्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बळ वाढविण्यात आले. नागपूर ते रामटेक आणि रामटेक ते कामठी असा दौºयाचा मार्ग (रस्ता) दोहोबाजूने सील करण्यात आला. त्यासाठी लगोलग वर्धा, चंद्रपूर, भंडारा येथून बोलवून घेण्यात आलेले पोलिसांचे मनुष्यबळ तातडीने या मार्गावर तैनात करण्यात आले. शहर पोलिसांनी सुमारे ५०० पोलीस आणि राज्य राखीव दलाची एक अतिरिक्त तुकडी मागवून घेतली. तर ग्रामीण पोलिसांनीही तेवढेच संख्याबळ वाढवून रामटेक ते नागपूरपर्यंतचा रस्ता सील केला. या भागात ऐनवेळी गुप्तचरही पेरण्यात आले.
फ्रीक्वेन्सी जॅमर बोलविले
राष्ट्रपती कोविंद हेलिकॉप्टरऐवजी विशेष वाहनाने रामटेकला जाणार आणि तेथून ते कामठीलाही वाहनानेच येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे, राष्ट्रपतींच्या वाहनाच्या ताफ्यातील वाहनांचीही संख्या वाढली. त्यासाठी ऐनवेळी तब्बल २० वाहने वाढविण्यात आली. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ वाहनांचा आणि फ्रीक्वेन्सी जॅमरचाही समावेश असतो. त्यानुसार, मुंबईसोबतच मध्य प्रदेश (भोपाळ) आणि छत्तीसगड (रायपूर) येथूनही फ्रीक्वेन्सी जॅमर बोलविण्यात आले. रिमोटचा वापर करून घातपाती कृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी जामरमुळे तो यशस्वी होत नाही. ऐनवेळी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, हे ध्यानात घेत सुरक्षा यंत्रणा एक सेफ झोन तयार करीत असते. त्याचेसुद्धा वेगळे काम करावे लागले. हे सर्व करण्यासाठी तसेच त्याची ट्रायल घेण्यापासून तो प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्थेला अंतिम रूप देण्यासाठी पोलिसांची पहाटेपर्यंत कसरत सुरू राहणार आहे, अर्थात रात्रीचा दिवस करून ही सुरक्षा व्यवस्था उभारावी लागणार असल्याचे एक वरिष्ठ अधिकारी लोकमतशी बोलताना म्हणाले
मध्यरात्रीपर्यंत संभ्रम
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपतींचे आवागमन वायुसेनेच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरने होणार, असे ठरले आहे. त्यानुसार, आज गुरुवारी सकाळी विमानतळावरून हेलिकॉप्टर उडाल्यानंतर थेट दीक्षाभूमीवर लॅण्ड झाले. यानंतर पोलीस मुख्यालय, तेथून कामठीला पोहचले आणि पुन्हा मुख्यालयी परतले. या दरम्यान कोणतीही गडबड झाली नाही. मात्र, दुपारी आलेला पाऊस आणि हवामान खात्याच्या अंदाजाने सुरक्षा यंत्रणांची व्यूहरचना बिघडवली. शुक्रवारी वातावरण असेच राहिले तर राष्ट्रपतींचा दौरा शहरातही हवाई ऐवजी जमीन मार्गेच होईल. त्यामुळे तशी पोलिसांनी व्यवस्था केली आहे. दोन्ही (हवाई आणि जमीन) मार्गाने सुरक्षेची व्यवस्था करण्यात आल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा नेमका हवाईमार्गे होणार की जमीनमार्गे ते स्पष्ट झाले नव्हते. त्याबाबत मध्यरात्रीपर्यंत संभ्रम होता.

Web Title: Issue-to-issue of President's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.