एनएडीटीमध्ये ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण : कर दुरुस्तीवर माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:11 PM2019-04-23T22:11:21+5:302019-04-23T22:20:24+5:30

अज्ञात विदेशी मालमत्तेची तपासणी, सामान्य अहवाल मानक आणि कर लागू करण्याच्या कडक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे सोमवारीपासून सुरू झाले. उद्घाटन एनएडीटीचे प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात ब्रिक्सच्या पाच देशातील २२ प्रतिनिधी प्रशिक्षण घेत असून समारोप शुक्रवारी होणार आहे.

International training for BRICS countries representative in NADT: tax amendment information | एनएडीटीमध्ये ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण : कर दुरुस्तीवर माहिती

एनएडीटी कॉम्प्लेक्समध्ये भारतीय कर कायद्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ब्रिक्स प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना एनएडीटीच्या प्रधान महासंचालक आशा अग्रवाल.

Next
ठळक मुद्देब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका देशांचे प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अज्ञात विदेशी मालमत्तेची तपासणी, सामान्य अहवाल मानक आणि कर लागू करण्याच्या कडक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे सोमवारीपासून सुरू झाले. उद्घाटन एनएडीटीचे प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात ब्रिक्सच्या पाच देशातील २२ प्रतिनिधी प्रशिक्षण घेत असून समारोप शुक्रवारी होणार आहे. 


एनएडीटी दक्षिण आशियाई देशांमधील कर अधिकाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करते. पण पहिल्यांदाच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील कर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा कार्यक्रम म्हणजे ब्रिक्स उच्चस्तरीय क्षमतेच्या बाईल्डिंग योजनेचा एक भाग आहे. यात भारताचे योगदान असून याकरिता एनएडीटीच्या प्रधान महासंचालक देशाच्या समन्वयक आहेत.
प्रशिक्षणादरम्यान काळा पैशाचा धोका कमी करण्यासाठी भारताने केलेल्या आर्थिक सुधारणांची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. यामध्ये माहितीचे आदानप्रदान, कर संहितांमध्ये सुधारणा, काळ्या पैशासंदर्भात नवीन कायदा, कर अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी, आंशिक आर्थिक अपहरण कायदा, बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा, आयकर कायदा १९६१ मधील दुरुस्ती आदींची माहिती देण्यात येत आहे.
अकॅडमिक सत्रांसह प्रतिनिधींना भारताच्या सांस्कृतिक विविधतेची माहिती करून देण्याच्या उद्देशाने दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक, गरबा, बिहू, भगरा या सारख्या नृत्यशैलीचे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: International training for BRICS countries representative in NADT: tax amendment information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.