वॉटर पार्कच्या पाण्यामुळे इन्फेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:44 PM2019-05-06T22:44:22+5:302019-05-06T22:45:44+5:30

सावनेर येथील द्वारका वॉटर पार्क येथे पिकनिकसाठी गेलेल्या काही युवकांना तेथील पाण्यामुळे ‘इन्फेक्शन’ झाले. या संदर्भात एक तक्रार पोलीस स्टेशन खापा येथे सोमवारी करण्यात आली. अमन रामटेके यांच्यासह चार जणांनी केलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, २८ एप्रिल रोजी द्वाराका वॉटर पार्क येथील पाण्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन झाले.

Infections caused by water park | वॉटर पार्कच्या पाण्यामुळे इन्फेक्शन

वॉटर पार्कच्या पाण्यामुळे इन्फेक्शन

Next
ठळक मुद्देचौघांनी केली खापा पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावनेर येथील द्वारका वॉटर पार्क येथे पिकनिकसाठी गेलेल्या काही युवकांना तेथील पाण्यामुळे ‘इन्फेक्शन’ झाले. या संदर्भात एक तक्रार पोलीस स्टेशन खापा येथे सोमवारी करण्यात आली. अमन रामटेके यांच्यासह चार जणांनी केलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, २८ एप्रिल रोजी द्वाराका वॉटर पार्क येथील पाण्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन झाले. पाण्यात क्लोरीन किंवा केमिकल्सचे प्रमाण जास्त असल्याने त्वचा रोग झाले असावे. उपचाराचा व औषधाचा खर्च द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे. या घटनेवर द्वारका वॉटर पार्कचे धरमदास रामानी म्हणाले, वॉटर पार्कमध्ये जागोजागी ‘वॉटर फिल्टर’ लावण्यात आले आहेत. पाण्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. ‘जापनीस टीसीसी’ने पाणी स्वच्छ केले जाते. वॉटर पार्कचे पाणी स्वच्छ असले तरी पाण्यात उतरताना व बाहेर निघाल्यावर ‘शॉवर’ घेण्याचा सूचना केल्या जातात. तसे फलकही आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Web Title: Infections caused by water park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.