नागपूर जिल्ह्यातील काटोल भागात सागवानाची अवैधपणे वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:47 PM2018-07-14T23:47:20+5:302018-07-14T23:48:17+5:30

नवीन स्मशानभूमीच्या मार्गात आडकाठी ठरू पाहणारी चक्क १५ ते १६ सागवानाची झाडे जेसीबीद्वारे उखडून टाकली. हा प्रकार लाडगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत घडला असून यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वन विभागाने कारवाईसाठी पाऊल टाकले आहे.

Illegal Sagwan tree cutting in Katol area of ​​Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील काटोल भागात सागवानाची अवैधपणे वृक्षतोड

नागपूर जिल्ह्यातील काटोल भागात सागवानाची अवैधपणे वृक्षतोड

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत लाडगावचा प्रताप : स्मशानभूमी बांधकामासाठी अट्टाहास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन स्मशानभूमीच्या मार्गात आडकाठी ठरू पाहणारी चक्क १५ ते १६ सागवानाची झाडे जेसीबीद्वारे उखडून टाकली. हा प्रकार लाडगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत घडला असून यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वन विभागाने कारवाईसाठी पाऊल टाकले आहे.
लाडगाव येथे जुनी स्मशानभूमी असून तेथे नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित होते. यासाठी निवडण्यात आलेल्या जागेवर १५ ते २० वर्षांपासून सागवान वृक्ष होते. त्यामुळे ते आडकाठी ठरण्याची चिन्हे दिसत होती. जागा निवडीबाबत गावातील काही नागरिकांना समजताच त्यांनी जुन्या स्मशानभूमीच्या ठिकाणीच नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करावे, अशा आशयाचे निवेदन काटोलच्या तहसीलदारांना दिले होते. दरम्यान, ग्रामपंचायतने जेसीबीद्वारे १५ ते १६ सागवान वृक्ष उखडून टाकले. शनिवारी हा प्रकार लक्षात येताच गावात खळबळ उडाली. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला सूचना दिली. वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी न घेतल्याने आता प्रकरण ग्रामपंचायतच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहे.
राज्यात एकीकडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला जातो. त्यानुसार कार्याला धूमधडाक्यात सुरुवातही करण्यात आली. मात्र अशाप्रकारे वृक्षतोड होत असेल तर शासनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ होतो, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Illegal Sagwan tree cutting in Katol area of ​​Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.