शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:00 AM2019-05-26T00:00:54+5:302019-05-26T00:01:50+5:30

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Hundreds of handpumps not in work: Nagpur Municipal administration ignored | शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरातील पाणीटंचाई विचारात घेता ‘लोकमत’ चमूने शहरातील विविध भागातील हॅन्डपंपची पाहणी केली असता प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले. सदर येथील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यानंतरही हॅन्डपंप दुरुस्त केला नाही. पाहणी केली असता नादुरुस्त हॅन्डपंपकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले.
पारडी रोड परिसरात पाण्याची टंचाई आहे. असे असूनही येथील हॅन्डपंप अनेक महिन्यापासून नादुरूस्त आहे. नारा-नारी भागात पाण्याची टंचाई आहे. अनेक वस्त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. या भागातील दोन हॅन्डपंप दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका हॅन्डपंप जवळ कचरा साचला आहे. नंदनवन रोडवरील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. दुरुस्तीसाठी झोन कार्यालयाकडे तक्रार केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कळमना मार्केट परिसरातील अनेक वस्त्यात पाणीटंचाई आहे. या परिसरातील हॅन्डपंप बंद आहे. त्यामुळे नागरिकांना याचा उपयोग नाही. हॅन्डपंप दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विक्रे त्यांनी सांगितले. धंतोली भागातील हॅन्डपंपाजवळ कचरा साचला आहे. पंप नादुरुस्त असल्याने त्याचा वापर केला जात नाही.
टीबी वॉर्ड चौकातील हा हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून अशा खराब परिस्थितीत पडला आहे. त्याच्या आजूबाजूला कचरा साचण्यासोबतच तणकटही वाढले आहे. याचा उपयोग नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Hundreds of handpumps not in work: Nagpur Municipal administration ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.