वीज चोरी करणाऱ्यांना गृह विभागाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 08:49 PM2018-03-06T20:49:53+5:302018-03-06T20:50:08+5:30

Home department's 'shock' to power stealers | वीज चोरी करणाऱ्यांना गृह विभागाचा ‘शॉक’

वीज चोरी करणाऱ्यांना गृह विभागाचा ‘शॉक’

Next
ठळक मुद्दे राज्यात १३२ पोलिस ठाण्यात होणार गुन्हे दाखल : विदर्भातील ३३ ठाण्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृह विभागने राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदभार्तील एक परिपत्रक गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंजाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधीत प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल.
साधारणत: प्रत्येक जिल्हयात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील. मोठया शहरांमध्ये ५ पोलीस ठाण्यांना वीज चोरी बाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूवीर्चे महावितरणचे ६ पोलीस ठाणे बंद करण्यात आले. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्हयात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्हयात ५, बीड जिल्हयात ४, ठाणे जिल्हयात १०, धुळे जिल्ह्यात ३, हिंगोलीत ३, नांदेड जिल्हयात ४ पोलीस ठाणे नाशिक जिल्हयात ५, जालन्यात ३, परभणी जिल्हयात ३, उस्मानाबाद 3, लातूर 3, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.
पुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीची तक्रार दाखल करता येईल. सोलापूर जिल्हयात ७, अकोला ७, अमरावती ७, भंडारा २, बुलढाणा २, चंद्रपूर ३, गडचिरोली २, गोंदिया जिल्ह्यात ३, जळगाव जिल्ह्यात ४, कोल्हापूर जिल्हयात ४, नंदूरबार ४, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३, सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३,यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.
७ हजार २७४ कोटींची थकबाकी
 वीज बिल न भरल्यामुळे राज्यातील निवासी २६ लाख ९० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे, तर २ लाख ३५ हजार कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. या निवासी ग्राहकांकडे दंड व्याजाची रक्कम म्हणून २३५१ कोटी तर कृषी ग्राहकांकडे ८८६ कोटी वीज बिलची थकबाकी आहे. वीज बिल न भरणाऱ्या निवासी, कृषी व अन्य ग्राहकांकडे दंड व्याज धरून ७ हजार २७४ कोटींची वीज बिलची थकबाकी आहे.

Web Title: Home department's 'shock' to power stealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.