व्यसन भागविण्यासाठी तो बनला बॅगलिफ्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:51 PM2019-06-03T23:51:44+5:302019-06-03T23:52:28+5:30

दारूचे व्यसन भागविण्यासाठी गुन्हे करणाऱ्या एका तरुणाच्या सदर पोलिसांनी मुसक्या बांधल्या. दीपक श्याम मेनलू (वय २५) असे त्याचे नाव असून, तो सदरमधील गोवा कॉलनीतील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची मोटरसायकल तसेच पाच मोबाईल जप्त केले.

He became a baglifter to suit the addiction | व्यसन भागविण्यासाठी तो बनला बॅगलिफ्टर

व्यसन भागविण्यासाठी तो बनला बॅगलिफ्टर

Next
ठळक मुद्देसदर पोलिसांनी बांधल्या मुसक्या : पाच मोबाईल आणि चोरीची मोटरसायकल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूचे व्यसन भागविण्यासाठी गुन्हे करणाऱ्या एका तरुणाच्या सदर पोलिसांनी मुसक्या बांधल्या. दीपक श्याम मेनलू (वय २५) असे त्याचे नाव असून, तो सदरमधील गोवा कॉलनीतील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची मोटरसायकल तसेच पाच मोबाईल जप्त केले.
दोन दिवसांपूर्वी दीपक सदर पोलिसांच्या गस्तीवरील पथकाच्या नजरेत पडला. त्याच्या मोटरसायकलला नंबरप्लेट नसल्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, दीपकने ती मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिली. त्याने ३० मे रोजी मंगळवारी बाजार परिसरात एका महिलेची बॅग हिसकावून नेली होती, त्याचीही कबुली दिली.
पोलिसांच्या चौकशीत दीपक दारूचे व्यसन भागविण्यासाठी चोरी करू लागल्याचे उघड झाले. दीपक आधी हिंगण्यातील एका कंपनीत काम करायचा. दारूच्या व्यसनामुळे त्याचे काम सुटले. त्यामुळे त्याला पैशाची चणचण भासू लागली. व्यसन पूर्ण करण्यासाठी त्याने बॅगलिफ्टिंग सुरू केली. आधी एक मोटरसायकल चोरली. त्यानंतर त्या मोटरसायकलने तो बॅगलिफ्टिंग करू लागला. त्याने ३० मे रोजी अलका राजेंद्र बागडे नामक महिलेची बॅग हिसकावून नेली. अलका यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. अलकाने सांगितलेल्या वर्णनाशी आरोपी दीपक मेनलूचे वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे आणि त्याच्या दुचाकीला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले होते. चौकशीत पोलिसांचा संशय खरा ठरला. त्याच्याकडून अलका यांचा मोबाईल तसेच अन्य चार मोबाईल आणि चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली. ठाणेदार महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पोलिसांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: He became a baglifter to suit the addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.