हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:36 PM2018-01-12T23:36:44+5:302018-01-12T23:39:45+5:30

उन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hathia-Pune-Hatia Express trips increase | हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेतली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८४८ हटिया-पुणे एक्स्प्रेस २७ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी हटियावरून सुटेल. तसेच ०२८४५ पुणे-हटिया सुपरफास्ट स्पेशल गाडी २९ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी सुटेल.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८४६ हटिया-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक बुधवारी रात्री ९ वाजता सुटेल. ही गाडी राऊरकेलाला रात्री १२.०५, झारसुगडाला १.५५, बिलासपूरला ४.४५, रायपूरला ६.२५, दुर्गला ७.२०, गोंदियाला ९.०८, नागपूरला ११.१५ वाजता, वर्धा १२.०२, बडनेरा दुपारी १.४२, अकोला २.४२, भुसावळ ४.३०, मनमाडला सायंकाळी ७.०५, कोपरगावला रात्री ८.१९, अहमदनगरला १०.५७, दौंडला रात्री १.०५ वाजता आणि पुण्याला शुक्रवारी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८४५ पुणे-हटिया सुपरफास्ट स्पेशल गाडी प्रत्येक शुक्रवारी पुणेवरून सकाळी १०.४५ वाजता सुटेल. ही गाडी दौंडला दुपारी १२.०५, अहमदनगरला १.५७, कोपरगावला दुपारी ३.५९, मनमाडला सायंकाळी ५.२०, भुसावळला ७.४०, अकोला रात्री ९.४७, बडनेराला ११.०५, वर्धाला रात्री १२.३२, नागपूरला १.५५, गोंदियाला ४.०६, दुर्गला सकाळी ६.१५, रायपूरला ६.५५, बिलासपूरला ९.१०, झारसुगडाला दुपारी १.०५, राऊरकेला २.३० आणि हटियाला शनिवारी सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १७ कोच आहेत. त्यात ४ एसी थ्री, १ एसी टु टायर, ६ स्लिपर, ४ सामान्य श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी वाढविलेल्या फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Hathia-Pune-Hatia Express trips increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.