दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त एक तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:05 AM2018-03-06T00:05:19+5:302018-03-06T00:05:30+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या परीक्षांना या महिन्यात सुरुवात होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याचे निश्चित केले आहे. सोबतच परीक्षा केंद्र पातळीवर आवश्यकता असल्यास लेखनिकदेखील उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.

Handicapped students get an additional one hour | दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त एक तास

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त एक तास

Next
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्र पातळीवर राहणार लेखनिकाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या परीक्षांना या महिन्यात सुरुवात होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याचे निश्चित केले आहे. सोबतच परीक्षा केंद्र पातळीवर आवश्यकता असल्यास लेखनिकदेखील उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर सोडविण्यासाठी लेखनिक मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘रायटर्स बँक’ स्थापन करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. नागपूर विद्यापीठातदेखील दिव्यांगांसाठी ‘रायटर्स बँक’ तयार करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु विद्यापीठ पातळीवर लेखनिकांची अशी यादी तयार होऊ शकली नाही. परंतु परीक्षा केंद्र अधिकाºयांच्या बैठकीत यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून परीक्षा केंद्र पातळीवरच लेखनिकांची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर लेखनिकांचा शोध घेण्यासंदर्भात निर्देशदेखील देण्यात आले आहेत. या लेखनिकांचे मानधन विद्यापीठाकडून देण्यात येईल, असे डॉ.येवले यांनी सांगितले.

Web Title: Handicapped students get an additional one hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.