येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात, प्रशासनाने घेतला 'हज यात्रा’ सुविधेचा आढावा

By आनंद डेकाटे | Published: June 1, 2023 01:50 PM2023-06-01T13:50:45+5:302023-06-01T13:51:50+5:30

विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारीने वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

Hajj Yatra will start from 7th June, the administration reviewed the 'Hajj Yatra' facility | येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात, प्रशासनाने घेतला 'हज यात्रा’ सुविधेचा आढावा

येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात, प्रशासनाने घेतला 'हज यात्रा’ सुविधेचा आढावा

googlenewsNext

नागपूर : येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात हो आहे.त्या पार्श्वभूमीवर हज यात्रेसाठी नागपूर येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेण्यात आला. विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारीने वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

प्रशासन उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ‘हज यात्रा २०२३’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य आसिफ खान, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदींचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी ७ ते १४ जून दरम्यान महाराष्ट्र , छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. तर १६ ते २४ जुलै दरम्यान यात्रेकरु हज यात्रेवरुन परतणार आहेत. या दरम्यान यात्रेकरुंची शहरातील हज हाऊस येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हज हाऊस येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष तसेच विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. यात्रेकरुंचा हज हाऊस येथील वास्तव्य तसेच विमानतळ परिसरातील व्यवस्था याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांनी पुरवावयाच्या व्यवस्थाबाबत गतीने कार्य करावे व उत्तमोत्तम सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशा सूचना यावेळी कुळकर्णी यांनी दिल्या.

Web Title: Hajj Yatra will start from 7th June, the administration reviewed the 'Hajj Yatra' facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.