हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने... : हौशी कलावंतांची धम्माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:01 AM2019-04-21T00:01:21+5:302019-04-21T00:03:17+5:30

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. व्यावसायिक गायक नसूनही त्यांचे मनमुराद गायन श्रोत्यांना आनंद देऊन गेले.

The green nature of this life, make life successful, have fun ...: Amateur artists Dhammal | हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने... : हौशी कलावंतांची धम्माल

हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफल करा मस्तीने... : हौशी कलावंतांची धम्माल

Next
ठळक मुद्देकुटुंब स्वरोस्तुतेचे मस्तीभरे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. व्यावसायिक गायक नसूनही त्यांचे मनमुराद गायन श्रोत्यांना आनंद देऊन गेले.
महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणाºया या कलावंतांनी विदर्भकर संगीतप्रेमींसाठी खास संगीतमय मेजवानी दिली. गणेशकुमार निकम आणि कामिनी भागवते यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शनिवारी हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात सादर करण्यात आला. कल्पना भंगाळे या निवेदनासह गायन तसेच नूतन भेलकर, सुमित्रा ठाकरे, संजय पळसोडकर, जय टंडन, अविनाश मारबते, तेजस आठवले, चेतन वानखेडे, सचिन पतरंगे, राहुल निकम या गायक कलावंतांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. कल्पना, कामिनी, चेतन आणि संजय यांनी संयुक्तपणे सादरीत ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...’ या मराठी भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे ‘दिल तो है दिल..., फुलों के रंग से..., तेरे चेहरे मे ओ जादू..., छु कर मेरे मनको..., दिल ने कहा..., दिल मे हो तुम..., बेपनाह प्यार है आजा..., तेरे दर पर सनम चले आये..., प्यार थोडा प्यार..., मेघा रे मेघा रे..., वादा करो नही छोडेंगे..., यू आर माय सोनिया..., प्यार मे दिल पे मार दे गोली..., प्यार बिना चैन कहां रे...’ असे वेगवेगळ्या ढंगातील नवे-जुने गाणे सादर केले. यासह ‘हिरवा निसर्ग हा भवतीने..., राधा ही बावरी..., रूपेरी वाळूत..., मला वेड लागले प्रेमाचे..., चोरीचा मामला...’ अशी मराठी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय महिला कलावंतांनी गायिका आशा भोसले यांच्या ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना..., दम मारो दम...’ अशी वेगवान कॅब्रे गाऊन टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. पुरुष गायकांनीही आर.डी. बर्मन व बप्पी लाहिरी यांची वेगवान गीते गात कार्यक्रम रंगतदार बनविला. श्रोत्यांनी या संगीत मेजवानीचा मनमुराद आनंद घेतला.

Web Title: The green nature of this life, make life successful, have fun ...: Amateur artists Dhammal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.