नागपुरातील पाचपावली भागात  गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:58 PM2018-04-30T13:58:11+5:302018-04-30T13:58:23+5:30

तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत पसरवली होती.

Goon hudloom in Panchpawali area of ​​Nagpur | नागपुरातील पाचपावली भागात  गुंडांचा हैदोस

नागपुरातील पाचपावली भागात  गुंडांचा हैदोस

Next
ठळक मुद्दे२४ वाहनांची तोडफोड : प्रचंड दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत पसरवली होती.
लाडपु-यात राहणारे ललित हिरामण पाठराबे (वय ३२) आणि गोलू रमेश निखारे या दोघांमध्ये रविवारी मध्यरात्री भांडण झाले. प्रारंभी बाचाबाची आणि हाणामारी झाल्यानंतर पाठराबेने निखारेला चाकू मारला. याची माहिती कळताच निखारेचे गुंड साथीदार शूभम कटारे (वय २२), अंडा उर्फ गौरव अनिल पारवे (वय १८), विकी प्रकाश पराते (वय २२) आणि त्यांचे चार ते पाच सशस्त्र साथीदार लाडपु-यात चालून आले. त्यांच्याकडे चाकू, लाठ्या, रॉड होते. त्यांनी देवराव उमरेडकर यांच्या घरावर आधी हल्ला चढवला. त्यांच्या दाराला लाथा मारल्यानंतर निलेश नंदनवार, प्रवीण कुराडकरच्या घरापासून तो ज्योती अनंत बुराडे (वय ३२) यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. आरोपी मोठमोठ्याने शिवीगाळ करून आरडाओरड करीत होते. त्यांनी तब्बल २४ वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या घटनेची माहिती कळाल्यानंतर पाचपावली पोलीस लाडपु-यात पोहचले. तत्पूर्वीच आरोपी पळून गेले होते. सोमवारी पहाटे ज्योती बुराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Goon hudloom in Panchpawali area of ​​Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.