नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाला तीन कोटी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:21 PM2018-02-14T21:21:52+5:302018-02-14T21:24:20+5:30

शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आवश्यक खर्च भागविण्यासाठी येत्या मार्चपर्यंत तीन कोटी रुपये देण्यात यावे याकरिता हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

Give three crore rupees to the National Law University of Nagpur | नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाला तीन कोटी द्या

नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाला तीन कोटी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : खर्च भागवणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आवश्यक खर्च भागविण्यासाठी येत्या मार्चपर्यंत तीन कोटी रुपये देण्यात यावे याकरिता हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
विद्यापीठासंदर्भात असोसिएशनची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे हे विद्यापीठ २०१६-२०१७ सत्रापासून कार्यान्वित झाले. विद्यापीठ कॅम्पसकरिता वारंगा येथील ७५ एकर जमीन देण्यात आली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळाले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सध्या हे विद्यापीठ सिव्हिल लाईन्स येथील ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (जोती) येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरू आहे. पहिल्या वर्षी विद्यापीठातील एल.एल.बी. अभ्यासक्रमात ६० तर, एल.एल. एम. अभ्यासक्रमात १० विद्यार्थी होते. यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यापीठाला खर्च भागवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता सरकारला विद्यापीठास तीन कोटी देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती असोसिएशनने न्यायालयाला केली आहे. असोसिएशनतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक कामकाज पाहात आहेत.

Web Title: Give three crore rupees to the National Law University of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.