नागपुरातील फुटाळा तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:48 PM2018-09-12T23:48:29+5:302018-09-12T23:49:27+5:30

उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने येथे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

Futala lake in Nagpur is 'Suicide Point' | नागपुरातील फुटाळा तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

नागपुरातील फुटाळा तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

googlenewsNext
ठळक मुद्देसाडेतीन वर्षात ४७ आत्महत्या : धंतोली, सीताबर्डी, अंबाझरीत आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने येथे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. २०१५ पासून धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किती गुन्हे झाले, त्यात आत्महत्यांचे प्रमाण किती होते, त्यात हत्या-महिलांवरील अत्याचार इत्यादींचे प्रमाण किती होते तसेच किती गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार फुटाळा तलावात १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण ४७ जणांनी आपला जीव दिला. २०१६ मध्ये येथे आत्महत्यांचे प्रमाण १४ इतके होते तर २०१८ मधील पहिल्या सात महिन्यांतच १३ जणांनी आत्महत्यांचे पाऊल उचलले. दरम्यान, धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या व्यतिरिक्त साडेतीन वर्षांत २७ जणांना आत्महत्या केली.

१८ गुन्हेगार तडीपार
१ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५२१९ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत एकूण १८ गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सीताबर्डी व अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी आठ जणांना तडीपार करण्यात आले.

फुटाळा तलावातील आत्महत्या
वर्ष             आत्महत्या
२०१५          १२
२०१६         १४
२०१७         ८
२०१८ (जूनपर्यंत) १३

Web Title: Futala lake in Nagpur is 'Suicide Point'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.