नागपूर विधानभवनासमोर बेरोजगारीने त्रस्त तरुणाने उडविली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:55 AM2017-12-15T09:55:15+5:302017-12-15T09:56:00+5:30

रॉकेलची बाटली पॅन्टच्या खिशात घेऊन विधानभवनासमोरच्या झाडावर चढलेल्या एका तरुणाने गुरुवारी दुपारी सुरक्षा यंत्रणेची काही वेळेसाठी चांगलीच तारांबळ उडवली.

In front of the Legislature of Nagpur, the untimely unemployment caused the turmoil of youth | नागपूर विधानभवनासमोर बेरोजगारीने त्रस्त तरुणाने उडविली खळबळ

नागपूर विधानभवनासमोर बेरोजगारीने त्रस्त तरुणाने उडविली खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देझाडावर चढून करीत होता आत्महत्येचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमत
नागपूर : रॉकेलची बाटली पॅन्टच्या खिशात घेऊन विधानभवनासमोरच्या झाडावर चढलेल्या एका तरुणाने गुरुवारी दुपारी सुरक्षा यंत्रणेची काही वेळेसाठी चांगलीच तारांबळ उडवली. सुनील भुजंग पाटील (वय २१) असे त्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील धानोरा गावचा सुनील रहिवासी आहे.
सुनील खासगी वाहन चालवतो. तो आठवीपर्यंत शिकला आहे. त्याने नोकरी मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षात अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, शिक्षण कमी असल्यामुळे त्याला नोकरी काही मिळाली नाही. नियमित रोजगार नसल्याने परिवाराचा उदरनिर्वाह चालविणे त्याला कठीण झाले आहे. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला. हिवाळी अधिवेशात सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतात, असा कुणीतरी चुकीचा सल्ला त्याला दिला. त्यामुळे तो नागपुरात आला. आपली रोजगाराची समस्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी तो गुरुवारी दुपारी विधानभवनासमोर आला. आतमध्ये जायचे आहे, असे त्याने तेथील सुरक्षा व्यवस्था सांभाळणाºयांना सांगितले. मात्र, त्याच्याजवळ अधिकृत पास नसल्याने पोलिसांनी तेथून त्याला हुसकावून लावले. बाहेर कुणी मंत्री आले की त्यांना आपली बेरोजगारीची समस्या सांगावी, अशा विचारात तो होता. मात्र, त्याची एकूणच स्थिती पाहून पोलिसांनी त्याला महापालिकेजवळ बनविलेल्या बॅरिकेडसच्या पलीकडे हुसकावून लावले. पोलिसांना हातपाय जोडूनही त्याला ते परिसरात थांबू देत नसल्याने तो संतप्त झाला आणि दुपारी ४ च्या सुमारास महापालिका आणि विधानभवनाच्या मधल्या भागात असलेल्या एका झाडावर चढला. त्याने जवळच्या लाल रंगाच्या दुपट्ट्याने गळफास लावून घेण्याची हालचाल केली. त्याचे मनसुबे ध्यानात आल्यामुळे खाली असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. ती ऐकून बाजूचे पोलीस धावले.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी
सुनीलला सदर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता आपण बेरोजगारीला कंटाळलो असून, आर्थिक कोंडीमुळे आपण आपली व्यथा सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो,असे पोलिसांना सांगितले. रात्रीपर्यंत पोलीस त्याचे समुपदेशन करीत होते.

Web Title: In front of the Legislature of Nagpur, the untimely unemployment caused the turmoil of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.