एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:34 PM2017-12-22T19:34:28+5:302017-12-22T19:37:17+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतके वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

Free Wifi service in ST bus earns additional revenue of one crore every year | एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

एसटी बसमधील मोफत वायफाय सेवेमुळे दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

Next
ठळक मुद्देपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतके वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
सदस्य प्रकाश आबिटकर, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे आदींनी राज्य महामार्ग परिवहन मंडळास एसटीमधील मोफत वायफाय सेवेमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना परिवहन मंत्री रावते यांनी म्हटले आहे की, एसटी बसेसमध्ये वायफाय प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून महामंडळास या प्रकल्पाद्वारे वार्षिक परवाना शुल्क म्हणून प्रतिवर्षी एक कोटी पाच लाख इतका अतिरिक्त महसूल पुढील पाच वर्षांसाठी प्राप्त होणार आहे. तांत्रिक कारणास्तव वायफाय उपकरण बंद पडल्यास सदर कंपनीकडून त्याची मोफत दुरुस्ती करून देण्यात येते, असे रावते यांनी उत्तरात म्हटले आहे.

Web Title: Free Wifi service in ST bus earns additional revenue of one crore every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.