नागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 08:31 PM2017-12-21T20:31:53+5:302017-12-21T20:33:59+5:30

पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला.

Four people drawn in the Pench canal in the Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले

नागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले

googlenewsNext
ठळक मुद्देपती - पत्नीचा समावेश : माहुली - मनसर मार्गावरील दुर्दैवी घटना

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला. या घटनेत चौघेही बुडाले. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली - मनसर दरम्यानच्या कालव्याच्या मार्गावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
कमलेश लालचंद जैन (कवाड) (२७), त्यांची पत्नी अंजली कमलेश जैन (कवाड) (२४), त्यांची बहीण प्रियंका राजू जैन (कवाड)कवाड (२३) तिघेही रा. महाजनवाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक व कमलेश जैन यांचा मावसभाऊ आशिष नरेंद्र जैन (गोलछा) (२३, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. आशिष हा कमलेश जैन यांच्याकडे पाहुणा म्हणून आल्याने या सर्वांसोबत पायल राजू जैन (कवाड) (२०, रा. महाजन वाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक) हे पेंच जलाशय परिसरात फिरायला जात होते. कमलेश, अंजली व प्रियंका एका मोटरसायकलवर तर आशिष व पायल स्कूटीवर होते.
दरम्यान, कालव्याच्या पुलाजवळ कमलेशची मोटरसायकल स्लीप झाली आणि तिघेही कालव्यात पडले. आशिष स्कूटी थांबवून त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने चौघेही वाहून जाऊ लागले. त्यातच पायलने आरडाओरड केली. त्यामुळे जवळच असलेल्या हुकूमचंद बिरो यांनी शिवारातील नागरिकांना मदतीला बोलावले. नागरिकांनी अंजली व प्रियंका यांचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या पटगोवारी नदीजवळ काठीने कालव्याच्या कडेला लावले. मात्र, कमलेश व आशिष वाहून गेले. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी कमलेश व आशिषला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
मनसर येथे शोककळा
कमलेश व अंजली यांचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. जैन कुटुंबीय मनसर येथील किराणा व्यावसायिक आहेत. ते सर्व आशिष जैन यांच्यासोबत पेंच डॅम परिसरात फिरायला गेले होते. ज्या ठिकाणी कमलेश यांची मोटरसायकल स्लीप झाली, त्या ठिकाणी रेती असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कमलेशची मोटरसायकल कालव्याच्या काठावर अडकली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोघे वाहून गेल्याने जैन कुटुंबीयांसह मनसर येथे शोककळा पसरली.

Web Title: Four people drawn in the Pench canal in the Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.