झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:43 AM2018-02-15T00:43:51+5:302018-02-15T00:50:54+5:30

व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली.

The flowers buds were become flowers, the trees were bloomed... | झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली...

झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली...

Next
ठळक मुद्देप्रेमरंगी रंगली तरुणाई : व्हॅलेंटाईन डेला कुणी केले रक्तदान, कुणी जागवले राष्ट्रप्रेम

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. कुणाच्या पदरात होकार पडला, कुणाच्या नकार. पण, म्हणून या प्रेमोत्सवाचा आनंद काही कमी झाला नाही. काही प्रतिगामी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता तरुणाईने अगदी दणक्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या दिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. या क्रमात कुणी रक्तदान केले तर कुणी भारतमातेच्या प्रतिमेला गुलाबाचे फूल भेट देत राष्ट्रप्रेम जागवले. मागच्या सात दिवसांपासून व्हॅलेंटाईन वीक साजरे करणाºया तरुणार्ईला व्हॅलेंटाईन डेची विशेष प्रतीक्षा होती. अखेर आज हा दिवस उगवताच अनेकांनी प्रेमाचा रंग असलेल्या लाल रंगाचे वस्त्र घालून महाविद्यालय गाठले. शहरातील प्रत्येकच महाविद्यालयाचे कट्टे आज बहरले होते.
फुटाळा झाले ‘लव्ह स्टेशन’
न्यू इयर असो फ्रेण्डशिप डे वा व्हॅलेंटाईन डे. शहरातील तरुणाईची पावले आपसूकच फुटाळा तलावाकडे वळतात. तरुणाईच्या हक्काचे हे डेस्टिनेशन या प्रेमोत्सवदिनी जणू ‘लव्ह स्टेशन’ झाले होते. प्रेमीयुगुलांच्या गर्दीने फुटाळा दिवसभर फुलले होते. संध्याकाळी तर जणू या ठिकाणाला यात्रेचेच स्वरूप आले होते. हातात रेड बलून घेतलेले ती आणि तो फुटाळयाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजरेस पडत होते. कुणी आपल्या जीवलगाला द्यायला भेटवस्तू आणली होती तर कुणी आपल्या हळव्या भावनांना शुभेच्छापत्रांच्या हवाली केले होते.
कुटुंबीयांसोबत हॉटेलिंग
केवळ तरुणाईच नाही तर प्रत्येकच वयोगटातील हौशी मंडळींनी या प्रेमोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. अनेक जण सहपरिवार जेवायला आल्यामुळे शहरातील हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. काही प्रसिद्ध हॉटेल्सनी हा क्षण कॅश करण्यासाठी स्पेशल पॅकेजही जाहीर केले होते. या पॅकेजसचाही लाभ उचलण्यात आला. काहींनी जवळपासच्या पर्यटनस्थळी तर काहींनी देवदर्शनाने हा दिवस साजरा केला.

Web Title: The flowers buds were become flowers, the trees were bloomed...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.