तलावांमधील कचरासफाईसाठी ‘फ्लोटिंग सायकल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:47 AM2018-04-06T00:47:01+5:302018-04-06T00:47:17+5:30

‘स्वच्छ भारत’ मोहीम देशभरात राबविण्यात येत असताना ‘सीएसआयआर-नीरी’नेदेखील पुढाकार घेतला आहे. तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडी प्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’ने पर्यावरण प्रेरणा विदर्भ यांच्या सहकार्याने ‘फ्लोटिंग सायकल’ची निर्मिती केली आहे. ‘इकोफ्रेंडली’ असलेल्या या ‘सायकल’मुळे एकाच वेळी तलावाची सैर व स्वच्छता शक्य होऊ शकणार आहे हे विशेष.

'Floating Cycle' for Trash Containers | तलावांमधील कचरासफाईसाठी ‘फ्लोटिंग सायकल’

तलावांमधील कचरासफाईसाठी ‘फ्लोटिंग सायकल’

Next
ठळक मुद्दे‘नीरी’चे संशोधन : एकाच वेळी सैर आणि स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘स्वच्छ भारत’ मोहीम देशभरात राबविण्यात येत असताना ‘सीएसआयआर-नीरी’नेदेखील पुढाकार घेतला आहे. तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडी प्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’ने पर्यावरण प्रेरणा विदर्भ यांच्या सहकार्याने ‘फ्लोटिंग सायकल’ची निर्मिती केली आहे. ‘इकोफ्रेंडली’ असलेल्या या ‘सायकल’मुळे एकाच वेळी तलावाची सैर व स्वच्छता शक्य होऊ शकणार आहे हे विशेष.
तलावांची सहजपणे स्वच्छता व्हावी या उद्देशातून ‘फ्लोटिंग सायकल’चे ‘डिझाईन’ तयार करण्यात आले आहे. या ‘सायकल’मध्ये ‘प्रोपेलर’देखील असून ‘हँडल’ने दिशा देता येणे शक्य आहे. या ‘प्रोपेलर’मुळे तलावांमध्ये वायुमिश्रणदेखील होते व यामुळे पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण वाढायला मदत होते. या प्रक्रियेमुळे तलावाच्या पाण्यात स्व-शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. या ‘फ्लोटिंग सायकल’मध्ये सुरक्षेचीदेखील तजवीज करण्यात आली असून ‘पीव्हीसी पाईप्स’चा उपयोग करण्यात आला आहे. कचरा गोळा करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या ‘सायकल’मध्ये कुठेही इंधनाचा वापर होत नसल्यामुळे तलावाचे प्रदूषण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ‘नीरी’तील संशोधकांनी सांगितले आहे.
‘नीरी’च्या संचालक संशोधन सेलच्या प्रमुख डॉ.आत्या कपले, डॉ.रिता धापोडकर व सौरव चक्रबर्ती यांच्या संकल्पनेतून ही ‘फ्लोटिंग सायकल’ तयार झाली आहे. ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’च्या अनसूया काळे, शरद पालीवार, रितेश तहलियानी, शेफाली यांनीदेखील यात मौलिक सहकार्य केले आहे. ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांनी या समाजासाठी उपयुक्त असलेल्या या प्रकल्पाला मार्गदर्शन केले.

मनपाला सोपविणार ‘फ्लोटिंग सायकल’
‘नीरी’ व ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्याकडून ही ‘फ्लोटिंग सायकल’ तलावांच्या स्वच्छतेसाठी मनपाला सोपविण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार हे मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांना ही ‘सायकल’ सोपवतील.

Web Title: 'Floating Cycle' for Trash Containers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.