नागपुरात आणखी पाच चिमुकल्यांचे श्रवणदोष दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:33 PM2018-11-03T22:33:28+5:302018-11-03T22:35:04+5:30

घरात आधीच दारिद्र्य त्यात चार वर्षाची रेणुका जन्मत: कर्णबधिर. रेणुकाचे वडील बांधकाम मजूर. आठ लाख रुपये खर्च करून महागडा उपचार करणे अशक्य. त्यामुळे मुलीला उपचार द्यावे तरी कसे या चिंतेने, या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले होते. परंतु शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून देत मेयोच्या ईएनटी विभागाने पुढाकार घेत रेणुकावर शनिवारी यशस्वी शस्त्रक्रिया करून कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून तिला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली.

Five more children in Nagpur hearing defect away | नागपुरात आणखी पाच चिमुकल्यांचे श्रवणदोष दूर!

नागपुरात आणखी पाच चिमुकल्यांचे श्रवणदोष दूर!

googlenewsNext
ठळक मुद्देमेयोच्या ईएनटी विभागाचा पुढाकार : आतापर्यंत १३ मुलांवर कॉकलिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरात आधीच दारिद्र्य त्यात चार वर्षाची रेणुका जन्मत: कर्णबधिर. रेणुकाचे वडील बांधकाम मजूर. आठ लाख रुपये खर्च करून महागडा उपचार करणे अशक्य. त्यामुळे मुलीला उपचार द्यावे तरी कसे या चिंतेने, या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले होते. परंतु शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून देत मेयोच्या ईएनटी विभागाने पुढाकार घेत रेणुकावर शनिवारी यशस्वी शस्त्रक्रिया करून कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून तिला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली.
विशेष म्हणजे, प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने, मेयोच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी व डॉ. विपीन इखार यांनी रेणुकासह पाच चिमुकल्यांवर तर आतापर्यंत १३ मुलांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. नागपूरसह विदर्भ आणि मध्य प्रदेशातील रेणुका रवींद्र शिंदेसह फिजा अन्सारी, मोहमंद अवेज शेख,शाहिद अन्सारी, ध्रृव भूरे, सोहन चिकलदर, रितिका जंगहरे, सिद्धी जाधव, सुमित पटले, नक्षत्रा तलमले, क्रिती सरकार, शीतल सोनकुसरे या चिमुकल्यांवर मेयोत कॉकलिअर इम्प्लांट करून त्यांना नवे जीवन देण्यात आले.
‘एडीआयपी’मुळे रुग्णांना फायदा
डॉ. वेदी म्हणाले, भारतात लहानपणीच इतर चाचण्यांबरोबरच श्रवण क्षमतेची चाचणी करून घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. परिणामी, उपचार असूनही अनेकांना आयुष्यभर मूकबधिर अवस्थेत जीवन जगावे लागते. श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागात ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ सेंटर सुरू झाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. या इम्प्लांटमुळे शब्द आणि त्याची संरचना त्या मुलाच्या मेंदूपर्यंत थेट जाते. शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लांटसाठी बाळाचा एक ते पाच वर्षापर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. ‘इम्प्लांट’ नंतर तीन वर्षे ‘स्पीच थेरपी’ द्यावी लागते. त्यानंतर रुग्णाला चांगले बोलता येते. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात या सर्वाला सात ते दहा लाखांचा खर्च येतो. परंतु केंद्र सरकारच्या ‘स्कीम आॅफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’मुळे (एडीआयपी) रुग्णाला एक रुपयांचा खर्च येत नाही. परंतु ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे.

Web Title: Five more children in Nagpur hearing defect away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.