नागपुरात तरुणीचे अपहरण करून पाच दिवस अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:59 PM2018-06-29T23:59:37+5:302018-06-30T00:02:23+5:30

जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक तरुणी व विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत तडीपार गुंडाने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर पाच दिवस अत्याचार केला. दुसऱ्या घटनेत ओळखीचाच युवक नऊ महिन्यापासून अत्याचार करीत होता. अत्याचाराची व्हिडिओ क्लीपिंग समोर आल्यावर हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले. तडीपार युवकाने युवतीचे अपहरण करून पाच दिवस तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेने पोलीसही हादरले आहे.

Five days raped after kidnapping of a girl in Nagpur | नागपुरात तरुणीचे अपहरण करून पाच दिवस अत्याचार

नागपुरात तरुणीचे अपहरण करून पाच दिवस अत्याचार

Next
ठळक मुद्देतडीपार गुंडाचे कृत्य : विवाहितेवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक तरुणी व विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत तडीपार गुंडाने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर पाच दिवस अत्याचार केला. दुसऱ्या घटनेत ओळखीचाच युवक नऊ महिन्यापासून अत्याचार करीत होता. अत्याचाराची व्हिडिओ क्लीपिंग समोर आल्यावर हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले. तडीपार युवकाने युवतीचे अपहरण करून पाच दिवस तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेने पोलीसही हादरले आहे.
पीडित २२ वर्षीय तरुणी २० जून रोजी दुपारी ४ वाजता जरीपटका पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरी गेली होती. पोलीस सूत्रानुसार तरुणीची मावशी नशेत होती. त्याचवेळी कुख्यात गुन्हेगार सचिन वर्मा (२३) तिथे आला. सचिन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला तडीपारही करण्यात आले आहे. तो तरुणी व तिच्या मावशीला ओळखतो. त्याने तरुणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तरुणीने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सचिनने तिला धमकावत आपल्यासोबत नेले. तरुणीने मावशीला सांगितले, परंतु ती नशेत असल्याने तिने लक्ष दिले नाही. आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत बाईकवर बसण्यास सांगितले. नकार दिल्यावर मारहाण केली. त्यामुळे तरुणी घाबरून बाईकवर बसली.
तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी तिला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे आपल्या आईला हिच्याशी लग्न करीत असल्याचे सांगितले. आईने लग्न करण्यास मनाई केली. यानंतर तो तिला हिवरीनगर येथील आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. तिथे मारहाण करून अत्याचार केला. त्याने पाच दिवस तिला बंधक बनवून ठेवले व सातत्याने अत्याचार केला. २४ जून रोजी सकाळी तरुणीला तिच्या घरी सोडून तो फरार झाला. तरुणीने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी गुरुवारी जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
दुसऱ्या घटनेत आरोपी २७ वर्षीय अमोल गजानन शेंडे हा आहे. आरोपी अमोल हा विवाहितेच्या शेजारी राहतो. विवाहितेच्या तक्रारीनुसार ती १ नोव्हेंबर २०१७ रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेली होती. त्याचवेळी अमोल तिथे आला. तिला एकटी पाहून बळजबरीने तिला घेऊन गेला. कोल्ड ड्रिंक्समध्ये बेशुद्ध होण्याचे औषध तिला पाजले. त्यानंतर अज्ञात स्थळी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याची व्हिडिओ क्लीपिंगही बनवली. तेव्हापासून तो विवाहितेवर अत्याचार करू लागला. विवाहितेचा पती वाहन चालक आहे. तो कामावर निघून जाताच अमोल तिच्या घरी यायचा आणि बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. मागील काही दिवसांपासून विवाहिता त्याला टाळू लागली होती. यामुळे त्याला राग आला. त्याने व्हिडिओ क्लीपिंग तिचा पती व इतर नातेवाईकांना पाठवली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. विवाहितेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून व्हिडिओ क्लीपिंगची तपासणी केली जात आहे.

तडीपार गुंडाला घेणार ताब्यात
सचिन वर्मा हा तडीपार असूनही शहरात फिरत होता. त्याला नंदनवन पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते. या प्रकरणानंतर पोलीस न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यात घेणार आहे. सचिनने तडीपार असताना अनेक गुन्हे केल्याचेही सांगितले जाते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या सर्वांचा खुलासा होईल.

पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात ज्याप्रमाणे गुन्हेगरी घटना वाढल्या आहेत. ते चिंताजनक आहे. शहर पोलीस स्वत:ला स्मार्ट आणि टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी वर्कशॉप आयोजित करीत आहे. अधिकारी-कर्मचारी त्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे गुन्हेगारही आपली ताकद दाखवित आहेत. पेन्शननगर चौकता झालेला गोळीबार आणि आता तडीपार सचिन वर्मा याचे कृत्य हे याचे उत्तम उदाहरण आहे.

Web Title: Five days raped after kidnapping of a girl in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.