उपराजधानीतील कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:34 PM2017-12-16T23:34:40+5:302017-12-16T23:40:55+5:30

कस्तूरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. शहराचे वैभव असलेल्या कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Five crore rupees for the development of Kasturchand Park | उपराजधानीतील कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी पाच कोटी

उपराजधानीतील कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी पाच कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणासर कस्तूरचंद डागा पुण्यातिथी शताब्दी समारोह

आॅनलाईन लोकमत
नागपूर : कस्तूरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. शहराचे वैभव असलेल्या कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सर कस्तूरचंद डागा यांच्या पुण्यतिथी शताब्दी समारोहानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्याम सोनी, गोविंद डागा, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, एलिबर्न वार्णे ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल आदी व्यासपीठावर उपस्थित होते. नितीन गडकरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

 

Web Title: Five crore rupees for the development of Kasturchand Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.