‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

By कमलेश वानखेडे | Published: December 15, 2023 05:27 PM2023-12-15T17:27:34+5:302023-12-15T17:31:41+5:30

फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

'Fire audit' of 'SRA' buildings twice a year, housing minister Atul Save announced | ‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

नागपूर: ‘आगीच्या घटना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) इमारतींचे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. सोबतच फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आ. विद्या ठाकूर यांनी  लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, जय भवानी एस.आर.ए गृहनिर्माण संस्था गोरेगाव या सोसायटीला ऑक्टोबर २०२३ मध्ये आग लागली. सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक रहिवासी जखमी झाले. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मात्र प्रत्यक्षात पूर्ण मदत अद्याप मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले. यावर मंत्री सावे म्हणाले, आगीची घटना घडल्यानंतर तातडीने बैठक घेतली. या इमारतीला फायर ऑडिट करून अग्निशमन उपकरणे अनिवार्य करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

 आ. रवींद्र वायकर यांनी मुंबई शहरात एसआरएची स्थिती वाईट असून पुनर्वसन म्हणून बांधलेल्या इमारतीत पुरेशा सुविधा नसल्याचे सांगितले. विकासकाला अतिरिक्त एफएसआय देतो. फायर ऑडिट करणार तर केव्हा करणार हे सांगण्यात यावे. यापूर्वीही असेच आश्वासन दिले, मात्र फायर ऑडिट झालेच नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बिल्डरांच्या घशात जात आहे, यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली.

अवैध रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करणार
- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘रूफ टॉफ हॉटेलमध्ये आगी लागतात. तक्रार आल्यानंतर पुण्यातील रूफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला.तोडपाणी करून पुन्हा हे हॉटेल सुरू करण्यात आले, असा दावा त्यांनी केला. अग्निशमनची परवानगी नाही तरीही असे हॉटेल सुरू आहेत. अवैध रूफ टॉप हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर ‘रूफ टॉप हॉटेलचा मुद्दा नगर विकास विभागाला पाठविण्यात येईल. अवैध हॉटेलवर बंदी आणू’, असे आश्वासन अतुल सावे यांनी दिले.

Web Title: 'Fire audit' of 'SRA' buildings twice a year, housing minister Atul Save announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.