मोहक सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे

By admin | Published: August 29, 2014 01:07 AM2014-08-29T01:07:22+5:302014-08-29T01:07:22+5:30

आंतरराष्ट्रीय नृत्यांचे सादरीकरण. उत्साहाला आलेले उधाण. टाळ्यांच्या कडकडाटाची दाद आणि अख्खे सभागृहच उत्सवात सहभागी करून घेताना राबविलेली अनोखी संकल्पना खास वातावरणनिर्मिती साधणारी.

Fadeley eye patch with an elegant presentation | मोहक सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे

मोहक सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे

Next

सेंट झेव्हिअर्सच्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यास प्रारंभ : पाच देशातील विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर : आंतरराष्ट्रीय नृत्यांचे सादरीकरण. उत्साहाला आलेले उधाण. टाळ्यांच्या कडकडाटाची दाद आणि अख्खे सभागृहच उत्सवात सहभागी करून घेताना राबविलेली अनोखी संकल्पना खास वातावरणनिर्मिती साधणारी. त्यात झिम्बाम्ब्वे, तर्की आदी देशातील लोकनृत्यात पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोहक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सेंट झेव्हिअर हायस्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कला व सांस्कृतिक सोहळ्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी महापौर अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा हा पहिला दिवस होता.
‘ब्रायटर टुमॉरो’ ही डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. जगातील पाच निरनिराळ्या देशांतील संस्कृती व कलाविष्काराचा संगम व्हावा हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे. या सोहळ्यात तर्की, झिम्बाब्वे, मोरोक्को, नायजेरिया व भारतातील एकूण २३०० विद्यार्थी व कलावंत सहभागी झाले आहेत.
उद्घाटनानंतर लगेच सोहळ्याला सुरुवात झाली. आकर्षक रंगसंगतींसह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांमुळे नृत्याची अनोख्या रंगांची उधळण झाली. पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. यात नागपूर गीताने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या ‘रॉक बॅन्ड’ तसेच चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालगीतांवरील नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. विदेशातील प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गेल्या ३ आठवड्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते. याप्रसंगी लहान मुलांनी ‘नन्हा मुन्ना राही हू...’या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. झिम्बाव्वेच्या दोन मुलींनी यावेळी रसिक आणि विद्यार्थ्यांशी छोटेखानी संवाद साधला. भारताची संस्कृती आपल्याला खूप आवडल्याचे तसेच हिंदी भाषा शिकण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. काही हिंदी शब्द ज्यात ‘शुक्रिया, नमस्ते’ आदी त्यांनी म्हणून दाखविले. एका मुलीने तर नागपुरात येऊन मराठीत एक वाक्य शिकल्याचे सांगितले. ते वाक्य कुठले, असे विचारले असता तिने तिच्या शैलीत ‘आता माझी सटकली’ हे वाक्य म्हणून दाखविले आणि सभागृहात हंशा पिकला. याप्रसंगी उंचच उंच जिराफाची मान, फुलपाखरांच्या भव्य प्रतिकृती नृत्यात उपयोगात आणण्यात आल्या. सभागृहात प्रेक्षकांमध्येही या प्रतिकृतींसह नृत्य करण्यात आल्याने हा अनुभव उपस्थितांना आनंद देणारा होता. शुक्रवारी या सोहळ्याची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fadeley eye patch with an elegant presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.