फेसबुक फ्रेंडशीपने केले विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 09:15 PM2018-08-02T21:15:28+5:302018-08-02T21:40:05+5:30

फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली.

Facebook Friendship has ruined the girl's life | फेसबुक फ्रेंडशीपने केले विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त

फेसबुक फ्रेंडशीपने केले विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देगुंगीचे औषध देऊन व्हिडीओ केला व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क      
नागपूर : फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके (२१) रा. गरोबा मैदान, हरिहरनगर यास अटक केली.
पीडित १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून सतीशशी ओळख झाली. तिच्या म्हणण्यानुसार सतीशने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून  जाळ्यात ओढले. ती बीबीएची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील आॅटो चालवितात. सतीश टवाळखोर असून व्यसनी आहे. पीडित विद्यार्थिनी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सतीशने तिला प्रभावित करण्यासाठी मोबाईल भेट दिला. १ जुलैला सतीशने तिला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले. घरी त्याचे कुटुंबीय असतील असे समजून ती त्याच्या घरी गेली. परंतु घरी सतीश एकटा होता. युवतीच्या तक्रारीनुसार सतीशने तिला पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिल्यानंतर तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली.त्यानंतर सतीशने तिच्यावर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली. काही वेळानंतर विद्यार्थिनीला शुद्ध येताच तिने सतीशला याबाबत विचारणा केली. त्याने शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केल्याचे सांगून घटनेची माहिती कुणाला दिल्यास ही क्लिप सोशल साईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने सतीशसोबत दुरावा केला. त्याच्याशी बोलणेही बंद केले. १० जुलैला सतीश तिच्यावर घरी येण्यासाठी दबाव टाकत होता. विद्यार्थिनीने त्याला आपल्याशी संबंध तोडून टाकण्यास सांगितले. सतीशने तिला दिलेला मोबाईल परत करण्यास सांगितला. तिने तो त्वरित परत केला. मोबाईलमध्ये सीमकार्ड होते. विद्यार्थिनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतरांच्या संपर्कात होती. तिचे व्हॉट्सअ‍ॅप पाहून सतीशच्या डोक्यातील राक्षस जागा झाला. त्याने व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ व्हायरल केला. बुधवारी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लकडगंज पोलिसात सतीश विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, छेडखानी, धमकी देणे, मारहाण करणे आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली. सतीश रामटेके व्यसनी असून एक-दोन वेळा व्यसनमुक्ती केंद्रात उपचारही घेतले आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे इतर विद्यार्थिनींचेही शोषण झाल्याची शंका आहे. या घटनेमुळे संबंधित विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात आहेत.

विवाहितेचा व्हिडीओही केला व्हायरल
दुसऱ्या एका घटनेत धंतोली येथील एका विवाहितेचा व्हिडीओही अशाच पद्धतीने एका युवकाने व्हायरल केल्याची घटना घडली आहे. यात ४८ वर्षीय विवाहित महिलेचे वस्तीतील २८ वर्षाच्या नीतेश ऊर्फ श्रीकांत बरडेसोबत संबंध होते. श्रीकांतने या महिलेसोबत आपत्तीजनक व्हिडीओ क्लिप तयार केली. ही क्लिप त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली. त्याची माहिती मिळताच विवाहित महिलेने तक्रार दाखल केली. धंतोली पोलिसांनी छेडखानी तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Facebook Friendship has ruined the girl's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.