नागपुरात महागाईच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 09:54 PM2019-11-06T21:54:05+5:302019-11-06T21:56:38+5:30

नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमाने राज्य व केंद्र सरकाराच्या विरोधात बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

Elgar of Congress against inflation in Nagpur | नागपुरात महागाईच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

नागपुरात महागाईच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

Next
ठळक मुद्देसंविधान चौकात धरणे आंदोलन : सरकारचा केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागाईने आज सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. बँकांची दिवाळखोरी सुरू आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. आत्महत्या करीत आहे. बेरोजगारीने कळस गाठला आहे आणि जीएसटीमुळे व्यापार डबघाईस आला आहे. अशी भयावह परिस्थिती असून यासाठी राज्य व केंद्रातील भाजप सरकारच पूर्णपणे दोषी असून, ते या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, या शब्दात काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत महागाईविरुद्ध एल्गार पुकारला.


नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमाने राज्य व केंद्र सरकाराच्या विरोधात बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे व ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा.काँग्रेस कमेटीचे सचिव आशिष दुवा, प्रदेश कॉग्रेस कमेटीचे सचिव व निरीक्षक आ. सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सरकारच्या अपयशावर प्रहार करण्यात आला. काँग्रेसने आणखी मजबुतीने जनतेचे प्रश्न सोडवावेत. लोकांमध्ये जाऊन काम करावे, सर्वांनी एकजुटीने राहावे, असे आवाहनही नेत्यांनी केले.
आंदोलनानंतर वाढलेली महागाई, बँकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, जीएसटी यामुळे ठप्प झालेले उद्योगधंदे, आरोग्य शिक्षण आदी समस्यांवर तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
आंदोलनात अ‍ॅड. अभिजित वंजारी, प्रशांत धवड, दीपक वानखेडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, माजी अध्यक्ष शेख हुसैन, प्रवक्ता अतुल लोंढे, आशीष देशमुख, गिरीश पांडव, हुकूमचंद आमदरे, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, त्रिशरण सहारे, नितीन ग्वालवन्शी, संजय महाकाळकर,रमेश पुणेकर, संदीप सहारे, जयंत लुटे, शेख असलम, विवेक निकोसे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, सेवादल काँग्रेस अध्यक्ष प्रवीण आगरे, ईरशाद अली, नगरसेवक साक्षी राऊत, रश्मी उईके, उज्ज्वला बनकर, पंकज लोणारे, अरुण डवरे, डॉ. विठ्ठल कोंबाडे, जगदीश गमे, जितू नारनवरे, सुभाष मानमोडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकार कुणाचेही असो संघर्ष सुरूच राहणार
यावेळी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सांगितले की, राज्यात सरकार कुणाचेही येवो नागरिकांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. नागरिकांनीही भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे. लोकसभेच्या तुलनेत काँग्रेसचे जवळपास दीड लाख मते वाढली आहेत. नागरिकांमध्ये जाऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राजेंद्र मुळक यांनीसुद्धा नागरिकांच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवण्यावर भर दिला.

Web Title: Elgar of Congress against inflation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.