नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरीची निवडणूक आता १९ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:17 PM2018-07-11T23:17:57+5:302018-07-11T23:18:51+5:30

वानाडोंगरी नगर परिषदेची १५ जुलैला होणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक आता १९ जुलै रोजी होणार आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. ११) जारी केला. सुधारित कार्यक्रमानुसार आता २० जुलैला मतमोजणी होणार असून पारशिवनी नगर पंचायतची मतमोजणीही त्याच दिवशी होणार आहे.

Election of Wanadongari in Nagpur district is now on 19th | नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरीची निवडणूक आता १९ रोजी

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरीची निवडणूक आता १९ रोजी

Next
ठळक मुद्देचार दिवस पुढे ढकलली : २० जुलैला पारशिवनी आणि वानाडोंगरीची मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : वानाडोंगरी नगर परिषदेची १५ जुलैला होणारी पहिली सार्वत्रिक निवडणूक आता १९ जुलै रोजी होणार आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. ११) जारी केला. सुधारित कार्यक्रमानुसार आता २० जुलैला मतमोजणी होणार असून पारशिवनी नगर पंचायतची मतमोजणीही त्याच दिवशी होणार आहे.
वानाडोंगरी नगर परिषदेत १० प्रभागातून २१ नगरसेवकपदासह एका नगराध्यक्षपदासाठी १५ जुलैला मतदान होणार होते. निवडणूक कार्यक्रमानुसार २ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार होते. परंतु त्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रभाग ३-अ, ४-अ, ६-ब, ७-अ आणि ९-ब या प्रभागातील पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरविले. या निर्णयामुळे त्या पाचही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या निर्णयाला आव्हान देत न्यायालयात अपील केले होते. मात्र जिल्हा न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाºयांचाच निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर उमेदवारांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली होती. अशात अपील दाखल झाल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी १० जुलैपर्यंत मुदत दिली होती. परंतु एकूणच निवडणूक प्रक्रिया पाहता उमेदवारांना वेळ मिळावा यासाठी मतदान आणि मतमोजणीची तारीख ही सुधारित करण्याची विनंती नागपूरच्या जिल्हाधिकाºयांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार महाराष्टÑ नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम ४ (ड) मधील तरतूद लक्षात घेता नगराध्यक्षपदासह सर्वच प्रभागातील सदस्यपदासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला. यानुसार आता १९ जुलैला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. दुसºया दिवशी अर्थात २० जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होईल.

सर्वच ठिकाणची मतमोजणी एकाच दिवशी
राज्यात वडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळी व पारशिवनी या चार नगर पंचायतीसह वानाडोंगरी नगर परिषदेची निवडणूक १५ जुलै रोजी होणार होती. त्यापैकी वानाडोंगरी नगर परिषदेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला आहे. परंतु उर्वरित नगर पंचायतींमध्ये मतदान १५ जुलै रोजीच होणार आहे. जुन्या निवडणूक कार्यक्रमानुसार १६ जुलैला मतमोजणी झाल्यास वानाडोंगरी नगर परिषदेच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणूक निकालाच्या दिवशीच अर्थात २० जुलै रोजी वडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळीसह नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगर पंचायतची मतमोजणी होणार आहे.

Web Title: Election of Wanadongari in Nagpur district is now on 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.