नागपुरात औषधांच्या तुटवड्याने रुग्णसेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:20 PM2018-04-05T22:20:00+5:302018-04-05T22:22:34+5:30

बाह्यरुग्ण विभागात रोज येणारे ६०० वर रुग्ण व वॉर्डात उपचार घेत असलेले १५० वर रुग्णांसाठी औषधेच नाही, फारच गरजू रुग्णांना कशीतरी औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु ती पुरेशी नाहीत. रुग्णांच्या रोजच्या तक्रारीला घेऊन रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात औषधांचा साठा संपला, मात्र औषध पुरवठा करणाऱ्या ‘हाफकिन’ कंपनीकडून अद्यापही औषधे उपलब्ध न झाल्याचे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

Due to shortage of drugs in Nagpur affect patients | नागपुरात औषधांच्या तुटवड्याने रुग्णसेवा प्रभावित

नागपुरात औषधांच्या तुटवड्याने रुग्णसेवा प्रभावित

Next
ठळक मुद्देकामगार रुग्णालयात भीषण स्थितीकेवळ १० टक्केच औषधांचा साठाजीवनावश्यक सोबतच सामान्य औषधेही नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाह्यरुग्ण विभागात रोज येणारे ६०० वर रुग्ण व वॉर्डात उपचार घेत असलेले १५० वर रुग्णांसाठी औषधेच नाही, फारच गरजू रुग्णांना कशीतरी औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु ती पुरेशी नाहीत. रुग्णांच्या रोजच्या तक्रारीला घेऊन रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात औषधांचा साठा संपला, मात्र औषध पुरवठा करणाऱ्या ‘हाफकिन’ कंपनीकडून अद्यापही औषधे उपलब्ध न झाल्याचे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.
सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून नागपुरात कामगार रुग्णालये स्थापन करण्यात आली. या कामगारांकडून कोट्यवधीची रक्कम शासनाकडे जमा होते, परंतु या रुग्णालयाच्या सोयी व विकासाकडे झालेल्या दुर्लक्षाने रुग्णच नव्हे तर रुग्णालय प्रशासनलाही याचा फटका बसत आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज ६०० वर रुग्ण येतात. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांना औषधे नसल्याचे लिहून देऊन बाहेरुन औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे. यावरून औषध वितरक आणि रुग्णांमध्ये भांडणे होत आहेत, तर अनेक कामगारांकडे औषध विकत घेण्याइतपत पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
आकस्मिक विभागात सलाईनही नाही
कामगार रुग्णालयात आकस्मिक विभाग आहे. रोज साधारण १५० वर रुग्ण उपचारासाठी येतात, परंतु येथे जीवनावश्यक औषधे तर नाहीच सामान्य औषधे आणि सलाईनही नाहीत. परिणामी, रुग्णांना, मेडिकल किंवा खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. विशेष म्हणजे, उन्ह वाढल्याने उष्माघात, ताप व दूषित पाण्यामुळे होणाºया गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत, परंतु या रुग्णांनाही औषधांसाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.
भरती रुग्णही अडचणीत
रुग्णालयात बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती रोग विभाग, अस्थिरोग विभाग आणि औषधवैद्यकशास्त्र विभागाचे चार वॉर्ड आहेत. सध्याच्या स्थितीत १५०वर रुग्ण उपचार घेत आहेत, परंतु येथेही औषधांना घेऊन कठीण स्थिती निर्माण झाली आहे. ऐनवेळी औषधांसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.
मार्चमध्येच संपला औषधांचा साठा
सूत्रानुसार, दर तीन महिन्यांचा औषधांचा साठा रुग्णालय प्रशासन उपलब्ध करून द्यायचे. मार्च महिन्यात हा साठा संपणार होता, यामुळे प्रशासनाने आयुक्तांना जानेवारी महिन्यातच प्रस्ताव पाठवून औषधांची मागणी केली, परंतु एकत्रित औषधे खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आल्याने आता याच कंपनीकडून औषधांचा साठा उपलब्ध होणार असल्याचे उत्तर मिळाले. आज-उद्या औषधांचा साठा मिळेल या आशेवर मार्च महिना संपला, परंतु नवीन साठा मिळाला नाही. औषधे नसल्याने रुग्णांचा रोजचा गोंधळ वाढला असून अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औषधांसाठी प्रस्ताव पाठविला आहे
औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वांरवार पाठविण्यात येत आहे. परंतु अद्याप औषधे उपलब्ध झालेली नाहीत. नियमानुसार स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी केली जात आहे. परंतु ही औषधे सर्वांनाच पुरतील असे नाही.
-डॉ. मीना देशमुख
वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय

 

Web Title: Due to shortage of drugs in Nagpur affect patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.