नागपुरात मैत्रिणीमुळे भाजपा पदाधिकारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:58 PM2018-11-10T23:58:08+5:302018-11-11T00:00:10+5:30

महिला मैत्रीण आणि पत्नीत जोरदार वाद झाल्याने भाजपाच्या शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका पदाधिकाऱ्याची चांगलीच गोची झाली आहे. महिला मैत्रीण आणि पत्नीतील वाद बाचाबाचीवरून हाणामारीवर गेल्याने प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. पदाधिकाऱ्याच्या हितचिंतकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याने या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Due to girl friend BJP office bearers facing trouble in Nagpur | नागपुरात मैत्रिणीमुळे भाजपा पदाधिकारी अडचणीत

नागपुरात मैत्रिणीमुळे भाजपा पदाधिकारी अडचणीत

Next
ठळक मुद्देबाचाबाचीवरून हाणामारी : दोन्हीकडून पाणउतारा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला मैत्रीण आणि पत्नीत जोरदार वाद झाल्याने भाजपाच्या शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका पदाधिकाऱ्याची चांगलीच गोची झाली आहे. महिला मैत्रीण आणि पत्नीतील वाद बाचाबाचीवरून हाणामारीवर गेल्याने प्रकरण जरीपटका ठाण्यात पोहोचले. पदाधिकाऱ्याच्या हितचिंतकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केल्याने या प्रकरणात तक्रार दाखल करण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शहर कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेले हे पदाधिकारी जरीपटक्यात राहतात. शुक्रवारी त्यांच्याकडे त्यांची महिला मैत्रीण पोहोचली. तिला पाहून पत्नीचा पारा चढला. पत्नीने तिचा पाणउतारा केल्याने महिला मैत्रिणीनेही त्याच भाषेत उत्तर दिले. घरातून काढण्यासाठी आणि न निघण्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आल्याने बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे समजते. हे कळताच भाजपात महत्त्वाची भूमिका वठविणारी मंडळी धावली. त्यांनीही दोघींत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघीही इरेला पेटल्याने वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथेही अनेक हितचिंतक पोहोचले. त्यांनी दोघींनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघी एकमेकींचा तेथेही पाणउतारा करीत राहिल्या. सायंकाळी शहरात भाऊबिजेची तयारी सुरू असताना जरीपटका ठाण्यात नगरसेवकांसह अनेक हितचिंतक दोन्ही जणींना ‘ताई घरी चला, तेथे काय ते बघू’, असे म्हणत दोघींची मनधरणी करीत होते. ठाण्याबाहेर गर्दी वाढल्याने पोलिसांवरही प्रचंड दडपण आले. दरम्यान,दोघींनीही आपापले गाऱ्हाणे तक्रारीच्या रूपाने पोलीस ठाण्यात मांडले. परिणामी पोलिसांनी या दोघींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. गुन्हा दाखल करण्याची जवळपास तयारी झाली. त्यामुळे हादरलेल्या हितचिंतकांनी या दोघींना त्याच्या गंभीर परिणामाची जाणीव करून दिली. एकदा गुन्हा दाखल झाल्यास काय होऊ शकते, हे समजावून सांगण्यात हितचिंतक यशस्वी ठरले. त्यामुळे या प्रकरणात जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे टळले.
दरम्यान, या प्रकरणाचे वृत्त शुक्रवारी रात्रीपासून शहरात कर्णोपकर्णी पसरल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली. भाजपा पदाधिकारी मैत्रिणीमुळे कसे अडचणीत आले, त्याची चर्चा आज दिवसभर शहरातील राजकीय वर्तुळात होती. दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणात बोलण्याचे टाळले. कशाला अडचणीत यायचे, अशी भूमिका घेत पोलिसांनी चुप्पी साधली. घटना खरी असली तरी गुन्हा दाखल नसल्याने काहीही बोलायचे नाही, असे पोलीस म्हणत होते.

Web Title: Due to girl friend BJP office bearers facing trouble in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.