डॉ. तायवाडे यांना धमक्यांचे फोन, न घाबरण्याचा निर्धार; सरकारशी चर्चेत २२ मागण्या मान्य; आंदोलन मागे

By कमलेश वानखेडे | Published: September 30, 2023 08:59 PM2023-09-30T20:59:24+5:302023-09-30T21:02:59+5:30

चंद्रपूर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने २२ मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. 

Dr. tayvade phone calls to Taiwade, determined not to panic; Accepted 22 demands in discussion with government; Movement back | डॉ. तायवाडे यांना धमक्यांचे फोन, न घाबरण्याचा निर्धार; सरकारशी चर्चेत २२ मागण्या मान्य; आंदोलन मागे

डॉ. तायवाडे यांना धमक्यांचे फोन, न घाबरण्याचा निर्धार; सरकारशी चर्चेत २२ मागण्या मान्य; आंदोलन मागे

googlenewsNext

नागपूर : ओबींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवांडे यांना धमक्यांचे फोन येऊ  लागले आहेत. अजूनही फोन द्वारे धमकी देणे सुरू आहे. गरज भासली तर त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करेल, असे डॉ. तायवाडे यांनी शनिवारी 
पत्रकार परिषदेत सांगितले. 

चंद्रपूर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने २२ मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. 

तायवाडे म्हणाले, सरकार सोबतच्या बैठकीचे  मिनिट्स आणि रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. त्यामुळे कुणी शंका घेण्याचे कारण नाही. चंद्रपूर मधील उपोषण सोडविण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. सरकारने दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील असा विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरातील आंदोलन सुद्धा स्थगित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

तीन आठवड्यांच्या आंदोलनाच्या काळात मी जे काही सार्वजनिक रित्या किंवा प्रसारमाध्यमांसमोर बोललो, त्याचा वेगळा अर्थ लावून काही लोक धमकीचे फोन करत आहेत. गरज भासली तर त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करेल. जेव्हा माणूस समाजासाठी समर्पित असतो तेव्हा अशा धमक्यांना घाबरायचे नसते. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. आम्ही संवैधानिक अधिकाराची लढाई लढत आहोत. ही लढाई मरेपर्यंत लढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Dr. tayvade phone calls to Taiwade, determined not to panic; Accepted 22 demands in discussion with government; Movement back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.