दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:04 AM2019-03-16T10:04:02+5:302019-03-16T10:04:34+5:30

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. निवडणुकीच्या कामात दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, दिव्यांगांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.

Divyaing's aslo work for elections | दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम

दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम

Next
ठळक मुद्देअडचणी लक्षात घेता निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. निवडणुकीच्या कामात दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, दिव्यांगांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाने दिव्यांग कर्मचारी व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना आहे. पण जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारी व शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणुकीचे आदेश दिले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना त्यासंदर्भातील पत्र आले आहे. अपंग कर्मचारी, शिक्षक हे कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर्स, सुलभ संचार व्यवस्था, हाताने अपंग असणाऱ्यांना लिखाणातील अडचणी, अल्पदृष्टी यांच्या दृष्टिदोषाच्या अडचणी, मूकबधिर, कर्णबधिर, चिन्ह भाषा, ऐकण्याच्या व संवादातील अडचणी आदींमुळे निवडणुकीसारख्या अति महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे निवडणूक कामात नेमणूक केलेल्या अपंग कर्मचारी व शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या पत्रातील सूचनेनुसार निवडणूक कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास भोतमांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Divyaing's aslo work for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.