नागपूर-कोचीला १५ नोव्हेंबरपासून थेट उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:46 AM2018-10-10T11:46:45+5:302018-10-10T11:47:37+5:30

इंडिगो एअरलाईन्स १५ नोव्हेंबरपासून नागपूर-कोची थेट उड्डाण सेवा सुरू करीत आहे. यापूर्वी इंडिगो १ नोव्हेंबरपासून चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू करणार आहे.

The direct flight from Nagpur-Kochi on November 15 | नागपूर-कोचीला १५ नोव्हेंबरपासून थेट उड्डाण

नागपूर-कोचीला १५ नोव्हेंबरपासून थेट उड्डाण

Next
ठळक मुद्दे१८० प्रवासी क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगो एअरलाईन्स १५ नोव्हेंबरपासून नागपूर-कोची थेट उड्डाण सेवा सुरू करीत आहे. यापूर्वी इंडिगो १ नोव्हेंबरपासून चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू करणार आहे.
१५ नोव्हेंबरपासून सुरू होणारे उड्डाण ६ ई ८१६ दरदिवशी रात्री ९ वाजता रवाना होईल. हे विमान रात्री ११ वाजता कोचीला पोहचेल. त्यानंतर हे विमान कोचीवरून रात्री ११.३० वाजता विमान क्र. ६ ई ८१७ नागपूरकडे रवाना होईल आणि रात्री १.३० वाजता पोहचेल. इंडिगो याकरिता एअरबस-३२० विमानाची सेवा घेणार आहे. त्याची प्रवासी क्षमता १८० सीटची आहे. नागपुरातून इंडिगोची विमानसेवा दक्षिण भारतात हैदराबाद आणि बेंगळुरू ते पुढे जाणार आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने प्रवाशांकडून विमान सेवेची मागणी करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय सेवांसाठी चेन्नई जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दक्षिण-पूर्वोत्तर देशांमध्ये सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलँड, लाओस, व्हिएतनाम येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. विमान कंपन्यांनी या पैलूंना ध्यानात ठेवून नवीन उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: The direct flight from Nagpur-Kochi on November 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.