हिरेजडित दागिन्यांचा नजराणा : नागपुरात ‘इन्ट्रिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:22 PM2018-10-20T22:22:15+5:302018-10-20T23:30:56+5:30

संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २० आॅक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ उपस्थित होते.

Diamond Jewelery Gifts: Inauguration of 'Intria' exhibition in Nagpur | हिरेजडित दागिन्यांचा नजराणा : नागपुरात ‘इन्ट्रिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन

हिरेजडित दागिन्यांचा नजराणा : नागपुरात ‘इन्ट्रिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देदर्जेदार दागिने सणाचा आनंद करणार द्विगुणित‘डान्सिंग डायमंड’ विशेष दागिना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २० आॅक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ उपस्थित होते.
प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या कल्पनेतून आविष्कृत झालेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ही नवी मालिका सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारी आहे. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन २० व २१ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शन सणांच्या दिवसांत नागपूरकरांसाठी एक सुवर्ण संधी आहे.
उद्घाटनप्रसंगी दिलीप देवसिंघानिया, डॉ. विनोद बोरा, माधुरी बोरा, प्रेम लुणावत, एल.एन. शर्मा, चंचल शर्मा, नीना जैन, किरण जैन, रितू जैन, अ‍ॅड. रमेश दर्डा, अतुल कोटेचा, रघुवीर देवगडे, चंचल शर्मा, अनिता दर्डा, सेजल शाह, निकिता दर्डा, बीना जयस्वाल, सीमा सेठ, सुनीता सुराणा, सविता संचेती उपस्थित होते.

पारंपरिक संस्कृती व अत्याधुनिकतेचा संगम
ऐन सणासुदीच्या दिवसांत लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नाविन्यपूर्ण व दर्जेदार हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार अनुभवायला मिळत आहे. अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे दागिने व त्यात साधण्यात आलेला पारंपरिक संस्कृती व अत्याधुनिकतेचा संगम हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशाप्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक दागिन्यातून कलात्मकतेचे दर्शन होणार आहे.

हिरेजडीत दागिन्यांचा अविष्कार
यंदा ‘इन्ट्रिया’चे आयोजन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. हिरेजडीत दागिन्यांचा अविष्कार आहे. आप्तांना अत्युत्तम दर्जाचे दागिने भेट देण्याची ही अनोखी संधी लाभली आहे. हिऱ्याचे हे दागिने केवळ लग्न किंवा पारंपरिक समारंभासाठीच नाही तर सर्वप्रकारच्या समारंभात वापरण्याजोगे आहेत. विशेष म्हणजे महिलांसोबत पुरुषांसाठीदेखील अंगठी आदी दागिने आहेत. व्हाईट गोल्ड, येलो गोल्ड आणि पिंक गोल्डचा उपयोग करून तयार करण्यात आलेले दागिने हे ‘इन्ट्रिया’चे वैशिष्ट्य आहे. यावर्षी ‘डान्सिंग डायमंड’ हे अनोखे  कलेक्शन प्रदर्शित केले आहे. याशिवाय महिलांसाठी नेकलेस, पेंडंट, इअररिंग, रिंग्ज, ब्रेसलेट तर पुरुषांसाठी ‘कफलिंग्ज’, हिºयाचे दागिने आणि ‘बटन्स’चे पर्याय उपलब्ध आहेत. यात हिरे, माणिक, मोती, रुबी इत्यादींचादेखील उपयोग करण्यात आला आहे. 

ज्वेलरी डिझाईन हाऊसमध्ये ‘इन्ट्रिया’ आघाडीवर
‘इन्ट्रिया’ची सुरुवात झाल्यापासून अत्यंत कमी कालावधीत याने लोकप्रियता मिळवली आहे. आज ‘इन्ट्रिया’चे नाव आघाडीच्या ज्वेलरी डिझाईन हाऊसमध्ये घेण्यात येते. ग्राहकांना तांत्रिकतेने परिपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तराचे दर्जेदार डिझाईन्स उपलब्ध करून देण्यासाठी ‘इन्ट्रिया’ नेहमीच तत्पर असते. ‘इन्ट्रिया’तील दागिन्यात साधारण, असाधारण व असाधारणला अविस्मरणीय करण्याची क्षमता आहे. येथील दागिने हे एकमेवाद्वितीय असून परिधान करण्यासदेखील सोपे आहेत. प्रत्येक दागिने तयार करताना आधुनिकतेसोबतच पारंपरिक आणि समकालीन भारतीय डिझाईन्सवरदेखील भर देण्यात आला आहे. हिरे, पन्ना, माणिक यांच्यामुळे दागिन्यांच्या श्रीमंतीत अधिक भर पडते. यात लग्नाच्या दागिन्यांसोबतच नेकलेस, ब्रेसलेट यांचा समावेश आहे. 
मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेल्या ‘इन्ट्रिया’चे संपूर्ण भारतभर प्रदर्शनांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येते. ‘इन्ट्रिया’चा प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि ट्रेंडी असावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येते. 

‘डान्सिंग डायमंड’ विशेष आकर्षण
या दागिन्याचे वैशिष्ट म्हणजे १८ कॅरेट सोन्याच्या चेनमध्ये ५ सेंटचा हिरा जडविण्यात आला आहे. थोडीही हालचाल झाल्यास तो आपल्या जागेत फिरतो. हा दागिना नेहमीच चमकतो आणि महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारा आहे. 

Web Title: Diamond Jewelery Gifts: Inauguration of 'Intria' exhibition in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.