डीव्हीआर प्रकरणी एसडीओ, तहसीलदार यांची विभागीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:24 PM2019-07-20T22:24:56+5:302019-07-20T22:26:13+5:30

उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार आणि एका नायब तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक (पीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती आहे.

Departmental inquiry of SDO, Tehsildar in DVR case | डीव्हीआर प्रकरणी एसडीओ, तहसीलदार यांची विभागीय चौकशी

डीव्हीआर प्रकरणी एसडीओ, तहसीलदार यांची विभागीय चौकशी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार आणि एका नायब तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक (पीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघात मतदान झाल्यावर इव्हीएम ठेवण्यासाठी उमरेड येथील आयआयटीच्या परिसरात तात्पुर्ती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती. येथून इव्हीएम कळमना येथील मुख्य स्ट्रॉंग रूम येथे हलविण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील स्ट्रॉंगरूममध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि एलसीडी स्क्रीन चोरीस गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी १२ दिवसानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. तक्रारीत एक डीव्हीआरचा उल्लेख होता. चोरट्यांनी मात्र दोन डीव्हीआर दिले. एलसीडी स्क्रीन मात्र मिळाली नाही. कॉंग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे दोन सदस्यीय पथक तपासणी करण्यासाठी आले. तपासणीत त्यांना महसूल आणि पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा लक्षात आला. तसा अहवाल मुख्य निवडणूक आयोगाला दिल्याची माहिती आहे. त्यानुसार आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Web Title: Departmental inquiry of SDO, Tehsildar in DVR case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.