नागपूरच्या  धरमपेठ चिल्ड्रेन पार्कमधील कंत्राटदारांची खेळणी हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:25 PM2018-06-12T22:25:00+5:302018-06-12T22:25:16+5:30

लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेने धरमपेठ येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची निर्मिती केली आहे. त्यादृष्टीने येथील रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क हे ट्रॅफिक पार्कच असावे. येथील खासगी कंत्राटारांची खेळणी हटविण्यात यावी. तसेच अ‍ॅम्युझमेंट पार्क पुढील पाच दिवसात बंद करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिले.

Delete the toys of contractors from Dharampeth Children Park in Nagpur | नागपूरच्या  धरमपेठ चिल्ड्रेन पार्कमधील कंत्राटदारांची खेळणी हटवा

नागपूरच्या  धरमपेठ चिल्ड्रेन पार्कमधील कंत्राटदारांची खेळणी हटवा

Next
ठळक मुद्देआयुक्तांचे निर्देश : अ‍ॅम्युझमेंट पार्क पाच दिवसात हटविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूुर : लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेने धरमपेठ येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची निर्मिती केली आहे. त्यादृष्टीने येथील रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क हे ट्रॅफिक पार्कच असावे. येथील खासगी कंत्राटारांची खेळणी हटविण्यात यावी. तसेच अ‍ॅम्युझमेंट पार्क पुढील पाच दिवसात बंद करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिले.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यक्षेत्रातील धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची पाहणी वीरेंद्र सिंह यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभिंयता मनोज तालेवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अभियंता प्रशांत सोनकुसरे आदी उपस्थित होते.
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथील भूत बंगला, मिरर शो, अन्य मनोरंजक साधने, जुन्या कंत्राटदार विभूती एन्टरप्रायजेच्या मालकीची खेळणी े पुढील पाच दिवसात हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या मालकीची असलेली लहान मुलांची खेळणीच या पार्क मध्ये राहतील. महापालिकेच्या मालकीची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने सुरू राहतील, अशी सूचना आयुक्तांनी केली. येथील खासगी खाद्य पदार्थांची दुकाने काढून टाकण्यात आली असल्याची माहिती अमोल चौरपगार यांनी दिली.
पार्कलगत असलेल्या जागेत महापालिकेच्या आरोग्य विभागाची इमारत आहे. ती बंद अवस्थेत आहे. त्याला सुरू करून ती जागा स्वच्छ करा, पार्कबाहेर असलेले हातठेले व दुकाने तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पार्क चे पार्किंग महापालिकेच्या अखत्यारित घेण्यात यावे, जेणेकरून त्यातून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच पार्किंग स्थळावर सूचना फलक लावण्याची सूचना केली.
आयुक्तांनी पार्कमधील स्थापत्य कामाची दुरुस्ती तात्काळ करण्याचे निर्देश उद्यान अधीक्षकना दिले. फ्लोरिंग, रस्त्याची डागडुजी, मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास त्यांनी सांगितले.

Web Title: Delete the toys of contractors from Dharampeth Children Park in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.