नागपुरात बालकाचे अपहरण व खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:54 PM2018-05-09T13:54:54+5:302018-05-09T13:55:06+5:30

दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली.

Death sentence for the abduction and murder of a child in Nagpur | नागपुरात बालकाचे अपहरण व खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

नागपुरात बालकाचे अपहरण व खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

Next
ठळक मुद्देदोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी केला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी हा निर्णय दिला.
आरोपी काळवेला खंडणीसाठी अपहरण (भादंवि कलम ३६४-अ) व खून (भादंवि कलम ३०२) या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना ११ जून २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी आरोपी खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना तो पोलीस असल्याचे सांगितले होते. आरोपी मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. मयत यश पाचव्या वर्गात शिकत होता. त्याचे वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. आई गृहिणी असून मोठी बहीण शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी यश घराजवळच्या परिसरात खेळत होता. दरम्यान, आरोपीने त्याचे अपहरण केले. यशला आरोपीच्या मोटरसायकलवर बसून जाताना दोन लहान मुलांनी पाहिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिहान परिसरात यशचा मृतदेह आढळून आला होता. न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.

Web Title: Death sentence for the abduction and murder of a child in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.