ग्राहकाने जिंकला डेव्हलपरविरुद्धचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:46 PM2017-10-26T15:46:20+5:302017-10-26T15:49:18+5:30

The customer won the fight against the developers | ग्राहकाने जिंकला डेव्हलपरविरुद्धचा लढा

ग्राहकाने जिंकला डेव्हलपरविरुद्धचा लढा

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकालदीड लाख रुपये व्याजासह परत मिळणार आॅनलाईन लोकमत

नागपूर : संपूर्ण देशामध्ये ग्राहकांना फसविणाऱ्यात  मालमत्ता व्यावसायिकांची संख्या सर्वाधिक आहे. बरेचदा ही फसवणूक ग्राहकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरते. म्हणूनच ग्राहक व मालमत्ता व्यावसायिकांमधील लढ्यात ग्राहकाचा विजय झाल्यास समाजमन सुखावते. असा सुखावणारा निर्णय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे. हक्काच्या लढ्यात ग्राहकाने डेव्हलपरवर मात केली आहे.
गोरक्षनाथ कोटांगळे असे ग्राहकाचे नाव असून ते भंडारा येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, कोटांगळे यांनी आशीर्वाद गॅलक्सी लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड कॉन्ट्रॅक्टर व सचिव प्रशांत मस्के यांच्यासोबत कामठी तालुक्यातील मौजा तिरोडी येथील २००० चौरस फुटाचा भूखंड ७ लाख रुपयांत खरेदी करण्याचा करार केला होता. त्यांतर्गत कोटांगळे यांनी १६ जानेवारी २०११ ते १२ जून २०१४ या कालावधीत डेव्हलपरला १ लाख ५८ हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांना सदर भूखंड नागपूर सुधार प्रन्यासच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी डेव्हलपरला पैसे परत मागितले, पण त्यांना केवळ सहा हजार रुपये परत देण्यात आले. परिणामी त्यांनी १६ सप्टेंबर २०१४ रोजी डेव्हलपरला नोटीस पाठवली. त्यावर काहीच उत्तर देण्यात आले नाही. शेवटी त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.
मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी विविध बाबी लक्षात घेता कोटांगळे यांची तक्रार अंशत: मंजूर केली आहे व त्यांना उर्वरित १ लाख ४० हजार रुपये ६ सप्टेंबर २०१४ ते रकमेच्या अदायगीपर्यंत १२ टक्के व्याज देऊन परत करण्यात यावेत असा आदेश डेव्हलपरला दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाचा मोबदला म्हणून २० हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्यात यावे असे सांगितले आहे. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला ३० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
हा तर अनुचित प्रकार
डेव्हलपरने तक्रारकर्त्यासोबत दुसऱ्याच्या  नावावरील भूखंड विकण्याचा करार केला. तसेच, तक्रारकर्त्याकडून वेळोवेळी पैसेही घेतले. ही बाब अनुचित प्रकारामध्ये मोडते असे मंचाने निर्णयात स्पष्ट केले.

Web Title: The customer won the fight against the developers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.