नागपुरात मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:43 PM2019-03-11T23:43:48+5:302019-03-11T23:45:07+5:30

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूर व गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मटका अड्ड्यांवर छापे मारले व कारवाईत १४ आरोपींना अटक केली.

Crime Branch raid on Mataka den in Nagpur | नागपुरात मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे

नागपुरात मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे

Next
ठळक मुद्दे१४ आरोपींना अटक : मानकापूर-गिट्टीखदान येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूर व गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मटका अड्ड्यांवर छापे मारले व कारवाईत १४ आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेच्या झोन-५च्या पथकाने ताजनगर झोपडपट्टीत छापा मारला. तेथे देवेंद्र्र शाहू (२८) रतननगर, मानकापूर, आयुष मेश्राम (२०) मेडिकल चौक, शेख असलम शेख बशीर (५१) पुलगाव, वर्धा, गणेश वेडेकर (३५) तांडापेठ, पाचपावली, सतीश फुलझेले (५७) इंदिरानगर, सूरज मेश्राम (२५) कमाल चौक, प्रकाश हरजानी (४२) जरीपटका, राजू नेतनराव (२२) मार्टिननगर, परदेव साहू (३४) यशोधरानगर तसेच कृष्णा बापूराव पेंदाम (५९) बैरामजी टाऊन यांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार गोलू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल सत्तार तेथून फरार झाला. पोलिसांनी आरोपींकडून २० हजार रुपये रोख व मोबाईलसह ६५ हजार रुपयांचे सामान जप्त केले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रमोद घोंगे, एएसआय महेद्र धोटे, हवालदार महेंद्र थोटे, मंगेश लांडे, शिपाई सुनील ठवकर, नरेंद्र ठाकूर, रवी साहू, अरुण चहांदे, प्रीतम ठाकूर, सचिन आंधळे, दिनेश चाफलेकर, नावेद शेख तसेच उत्कर्ष राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याचप्रकारे झोन-२ च्या पथकाने सुरेंद्रगड येथील ‘व्हेटरनरी कॉलेज’जवळील मटका अड्ड्यावर धाड टाकली. तेथून राजेश टेकाम (५१) मकरधोकडा, अफरोज बशीर शेख (२३) न्यू येरखेडा, ओविन वेनहाफटेन (२६) सेमिनरी हिल्स तसेच लव सुखदेव मसराम (२३) यांना अटक केली. आरोपींकडून रोख रकमेसह साडेआठ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय राजकुमार त्रिपाठी, हवालदार प्रशांत देशमुख, संतोष निखार, संतोष मदनकर, योगेश गुप्ता, सागर ठाकरे, सचिन आंधळे तसेच अरविंद झिलपे यांच्या पथकाने केली.

Web Title: Crime Branch raid on Mataka den in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.