संयुक्त मोजणीचे प्रस्ताव तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी

By गणेश हुड | Published: November 1, 2023 04:39 PM2023-11-01T16:39:02+5:302023-11-01T16:39:25+5:30

मेट्रो फेज २ प्रलंबित अधिग्रहण आढावा बैठक

Complete joint enumeration proposals promptly - District Magistrate | संयुक्त मोजणीचे प्रस्ताव तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी

संयुक्त मोजणीचे प्रस्ताव तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी

 नागपूर :नागपूरसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मेट्रो फेज २ प्रकल्पातील जमीन अधिग्रहणाचे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत.  कोणताही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महसूल विभागाला केल्या. अधिग्रहणाचा आढावा  घेण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात  बैठक घेण्यात आली.

यावेळी  भूमी अधिग्रहण संदर्भातील सर्व प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय काही प्रकरणात संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. वर्धा रोडवरील संरक्षण विभागाच्या जागे संदर्भात तातडीने पत्रव्यवहार करण्यात यावा. महसूल विभाग व मेट्रो यांच्यामध्ये अधिक उत्तम समन्वय ठेवून  कामे करण्यात यावे. उर्वरित सर्व भूमी अधिग्रहणाच्या प्रकरणांमध्ये कालबद्ध नियोजन करण्यात यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) माधुरी तिखे, उपजिल्हाधिकारी (पेंच प्रकल्प) डॉ.पुजा पाटील, महा मेट्रोचे आर.आनंदकुमार, महामेट्रोचे प्रकाश सकरडे, उपमहाव्यवस्थापक अजय रामटेके, भूमी अभिलेख कामठीचे उपअधीक्षक श्याम पांडे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक आशिष मोरे, नगर रचनाचे सुरज बालेकर, सादिक अली उपस्थित होते.

Web Title: Complete joint enumeration proposals promptly - District Magistrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.