शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:41 PM2019-01-11T21:41:32+5:302019-01-11T21:42:52+5:30

काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरविताना आता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे मत विचारात घेतले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या मंडळाचे अध्यक्षपद शहर व जिल्हाध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित अध्यक्षांना आपल्या शिफारशीसह संभाव्य उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.

City and District President will recommend the Lok Sabha candidate | शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस

शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस

Next
ठळक मुद्देप्रदेश काँग्रेसकडे देतील अहवाल : निवड मंडळाचे अध्यक्षपद सोपविले

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरविताना आता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे मत विचारात घेतले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या मंडळाचे अध्यक्षपद शहर व जिल्हाध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित अध्यक्षांना आपल्या शिफारशीसह संभाव्य उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नागपूर शहर काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभेचा उमेदवार दिल्लीहून ठरविताना स्थानिक काँग्रेस कमिटीचे मत विचारात घ्यावे, असा प्रस्ताव शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ठेवला होता. संबंधित प्रस्ताव एकमताने पारित करून प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला होता. आता प्रदेश काँग्रेसने संबंधित मागणी मान्य करीत शहर व जिल्हा काँग्रेस समित्यांना विश्वासात घेण्याची तयारी दर्शविली आहे.
लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी शहर किंवा जिल्हाध्यक्षांनी निवड मंडळाची बैठक बोलवायची आहे. संबंधित बैठकीत चर्चा करून शहर किंवा जिल्हाध्यक्षांनी आपल्या शिफारशीसह संभाव्य उमेदवाराचे नाव प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नमुन्यात भरून पाठवायचे आहे. यामुळे आता उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत अध्यक्षांना महत्त्त्व प्राप्त झाले आहे.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ही प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर काम करणारी पक्षाची यंत्रणा आहे. लोकसभा उमेदवार निवडीत या यंत्रणेला विश्वासात घेण्याचा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी वेळ देणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे.
 विकास ठाकरे,
शहर अध्यक्ष,
नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

Web Title: City and District President will recommend the Lok Sabha candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.