नागपुरात नागरिकांचा आक्रोश अन् गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:26 PM2018-12-24T22:26:57+5:302018-12-24T22:30:07+5:30

सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व पाणीटंचाईच्या मुद्यावरून नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात सोमवारी आक्रोश करून गोंधळ घातला. संतप्त नागरिकांनी व्यासपीठाजवळ गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांना आवरले.

Citizens resentment and raging in Nagpur! | नागपुरात नागरिकांचा आक्रोश अन् गोंधळ !

नागपुरात नागरिकांचा आक्रोश अन् गोंधळ !

Next
ठळक मुद्देजनसंवाद कार्यक्रमात नगरसेवक व प्रशासनावर व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व पाणीटंचाईच्या मुद्यावरून नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात सोमवारी आक्रोश करून गोंधळ घातला. संतप्त नागरिकांनी व्यासपीठाजवळ गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांना आवरले. 


कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दोन पंप बंद आहेत. परिणामी शहरातील काही वस्त्यांना कमी पाणीपुरवठा होत आहे. शाहूनगर, बिनाकी मंगळवारी, नाईक तलाव, बांगलादेश यासह अनेक वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिक ांनी केली तसेच नळाला दूषित पाणी येत असल्याचे सांगितले.
नगरसेवकाची होणार होती पूजा
नगरसेवक संजय चावरे यांच्या प्रभागात दर्शनही होत नसल्याची तक्रार रजनी मोहाडीकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी केली. वॉर्डातील समस्या सुटत नसल्याने नगरसेवकाची पूजा करण्यासाठ़ी मोहाडीकर या महिलेने पूजेचे ताटही सोबत आणले होते. पूजेचे ताट घेऊन ही नगरसेविका व्यासपीठावर चढणार तोच पोलिसांनी तिला आवरले. पाण्याची लाईन, गडरलाईन आणि रस्ते अशा तीन तक्रारी घेऊन ही महिला जनसंवाद कार्यक्रमात आली होती. प्रभागातील नागरिकांनीही नगरसेवकांच्या विरोधात रोष व्यक्त केला.
हलबांना शासनाचे संरक्षणच
हलबांना शासनाने संरक्षण दिले आहे. तसे शासनाचे परिपत्रक निघाले आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राकेश बोरीकर या व्यक्तीने शासनाने हलबांसाठी काहीच केले नाही, असा आरोप केला होता. नगरसेवक रमेश पुणेकर यांनीही हा आरोप केला. त्यावर पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शासनाने हलबा समाजाच्या एकाही व्यक्तीला नोकरीवरून काढले नाही. जात प्रमाणपत्राबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे न्यायालयाच्या निकालापर्यंत थांबावे लागणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर शासन गंभीर असलयाचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ट्रंकलाईन जीर्ण, वस्त्यात घाण पाणी
नाईकतलावात मनपाने गडर लाईनचे पाणी सोडल्याची तक्रारही करण्यात आली. याच दरम्यान नगरसेविका आभा पांडे यांनी आपल्या प्रभाागातील चकना चौक येथील ट्रंकलाईन ही इंग्रजांच्या काळातील असून ती अत्यंत जीर्ण झाली आहे. ती बदलणे गरजेचे आहे. घाण पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. जीर्ण गडर लाईनमुळे वॉर्डात अनेक ठिकाणी आपोआप खड्डे पडत असल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. या कामासाठी आपण अनेकदा आयुक्तांना भेटलो असल्याचेही त्या म्हणाल्या.
नासुप्रच्या जागेतील प्लॉटची अवैध विक्री
नासुप्रच्या शांतीनगर येथील एक एकर जागेवर कब्जा करून स्थानिक आमदार व व माजी नगरसेकाने प्लॉटची विक्री करून नागरिकांची फसणूक केल्याची तक्रार मारवाडी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनसंवाद कार्यक्रमात केली. यासंदर्भात चौकशी करून प्लॉटची विक्री बेकायदेशीर असेल तर त रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना दिले.

 

Web Title: Citizens resentment and raging in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.