मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:38 AM2018-04-08T01:38:21+5:302018-04-08T01:38:57+5:30

मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Central Railway train for first time in Nagpur | मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदा नागपुरात

मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदा नागपुरात

Next
ठळक मुद्देआकर्षक प्रदर्शन : उल्लेखनीय कामगिरीबद्दल होणार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
१२ एप्रिलला नागपुरात गुंजन सभागृहात आयोजित समारंभात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच रेल्वे बोर्डाच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या चार रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापकांकडून उल्लेखनीय प्रदर्शन करणाऱ्या मध्य रेल्वेच्या पाच विभागातील एका विभागाला संपूर्ण दक्षता शिल्ड आणि विविध विभागीय शिल्ड प्रदान करण्यात येतील. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन नागपुरात होत आहे. यानिमित्त आयोजित प्रदर्शनातून नागरिक, मुलांना शिक्षित करण्यात येईल. प्रदर्शनात भारतीय रेल्वेची ओळख, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचे ऐतिहासिक भवन, मध्य रेल्वे आणि पाच विभागातील स्काऊट आणि गाईड आदी विषयांची माहिती प्रदर्शनात राहील. लोकोमोटिव्ह कोच, माथेरान टॉय ट्रेन आणि बुलेट ट्रेनचे मॉडेल यात आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क राहील.
पाच दिवस होम प्लॅटफार्मवरून सुटणार नाहीत गाड्या
रेल्वे सप्ताह आणि प्रदर्शनाच्या आयोजनामुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या होम प्लॅटफार्म म्हणजे आठव्या प्लॅटफार्मवरून ८ ते १३ एप्रिलदरम्यान कोणत्याच रेल्वेगाड्या सोडण्यात येणार नाहीत. या प्लॅटफार्मवरून सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या संबंधित कालावधीत इतर प्लॅटफार्मवरून सोडण्यात येणार असून, प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Central Railway train for first time in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.