नागपूर महानगरपालिका थकबाकीदारांकडून वाहने, मोबाईल व फ्रीज जप्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:20 AM2018-01-08T10:20:14+5:302018-01-08T10:23:10+5:30

महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता प्रशासनाने आता २५ हजारापर्यत मालमत्ता कर थकबाकी असलेल्यांवर जप्तीची कारवाई करण्याची तयारी केली आहे.

Capture of vehicles, mobile and freeze from Nagpur Municipal Bankers | नागपूर महानगरपालिका थकबाकीदारांकडून वाहने, मोबाईल व फ्रीज जप्त करणार

नागपूर महानगरपालिका थकबाकीदारांकडून वाहने, मोबाईल व फ्रीज जप्त करणार

Next
ठळक मुद्देथकबाकीदारांची संख्या दोन लाखांच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता प्रशासनाने आता २५ हजारापर्यत मालमत्ता कर थकबाकी असलेल्यांवर जप्तीची कारवाई करण्याची तयारी केली आहे.
अशा थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. पत्ता व नावासह ही यादी तयार केली असून वाहने, मोबाईल, फ्रीज अशा वस्तू जप्त करणार आहे. अशा थकबाकीदारांची संख्या १ लाख ९२ हजार ६१५ इतकी आहे. त्यांच्यावर ७४ कोटी ८६ लाख ८ हजारांची थकबाकी आहे.
मालमत्ता विभागाची डिसेंबर अखेरीस ११४ क ोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत १.७५ कोटींनी अधिक आहे. उद्दिष्ट विचारात घेता ही वसुली समाधानकारक नाही. त्यामुळे प्रशासनाने जप्तीची कारवाई व्यापक स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थायी मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई झोन स्तरावर सुरू आहे.
आता अस्थायी संपत्ती म्हणजेच घरातील वस्तू व वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनी दिली. या कारवाईसाठी प्रत्येक झोनमध्ये दोन पथके गठित करण्यात आली आहे. जप्तीच्या कारवाईसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. वाहतुकीसाठी पथकाला वाहने उपलब्ध के ली जाणार आहे.
मोठ्या थकबाकीदारांना अभय कशासाठी
नागपूर शहरात मोठ्या थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. एम्प्रेस मॉलकडे १७ कोटी, मिहानकडे १३ कोटींची थकबाकी आहे. अशा प्रकारचे शेकडो मोठे थकबाकीदार आहेत. परंतु त्यांच्यावर जप्ती वा लिलावाची कारवाई केली जात नाही. मात्र छोट्या थकबाकीदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
असे आहे चौकशी पथक
झोन स्तरावरील चौकशी व जप्ती पथकात कर निरीक्षक, दोन सहायक , दोन सफाई मजूर, एक महिला व एक पोलीस कर्मचारी आदींचा समावेश राहणार आहे. थकबाकीदारांच्या घरी जाऊन वॉरंटच्या आधारे जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Capture of vehicles, mobile and freeze from Nagpur Municipal Bankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.